Sunday, November 23, 2025

मोतीबाई यांचे बलिदान आणि शौर्यगाथा कथामंजिरी 4-3-22 -MadArt369 Illustration

 


आजचा अग्रलेख म्हणजे जीवाला जीव लावणारा "जीवश्च-कंठश्च" आप्त/मित्र कसा असतो याची परिभाषा समजावणारा आहे.


*मोतीबाईच्या शौर्याला आणि कृतज्ञतेला खरंच इतिहासात तोड नाही.*

* आपल्या आप्तजणांच्या सुरक्षिततेची खात्री करून मगच टोकाचे पाऊल उचलणारी मोतीबाई...

* आपल्या राणी लक्ष्मीबाईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपला 108 जपसंख्येचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावणारी मोतीबाई...

शत्रूचा थरकाप उडविणाऱ्या या विरांगनेचा थरारक इतिहास अजून कुठे वाचायला मिळेल..

दै. 'प्रत्यक्ष' एकमेव जो इतिहासात दडलेली पाने उलगडून मार्गदर्शन करणारा जिवश्च-कंठश्च मित्र...
🙏🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय
🙏🙏🙏


४/३/२२

आजच्या कथामंजिरीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, (जी ग्रंथात सांगितलेली आहे) ती ही की,
खरी ताकद आपल्या इष्ट देवतेच्या अस्तित्वाच्या स्मरणात आहे.

इतिहासात ज्यांच्याकडून शौर्य घडले
ते सर्व भक्तच होते.
शिवाजी महाराज,महाराणा प्रतापसिंह,महात्मा गांधी,नेताजी बोस,
विवेकानंद,पहिला बाजीराव हे सर्वच भक्ती करत होते.

झाशीची राणी लक्ष्मीबाईही भक्ती करत होती.तिचा अत्यंत आवडता व नित्य जप होता,
ॐ नमो भगवते वासुदेवाय!

आणि मोतीबाई तिच्या तालमीत तयार झालेली,तिच्या संस्कारात तयार झालेली.
ती  मोतीबाई भक्तीशिवाय कशी राहू शकेल? तो जप १०८ वेळा करूनच ती  राणीची पवित्र तलवार गंगेला अर्पण करणार होती.
आणि ती त्यावेळी  वृद्ध विधवेच्या
वेशात नव्हती,तर ती झाशीच्या सैनिकी वेशात होती.

खरंतर विधवेच्या वेशात तिला ब्रिटिशांकडून कुठलाच धोका नव्हता.

पण त्या सैनिकी वेशामुळे तिला ब्रिटिशांच्या एका भारतीय सैनिकाने ओळखले.व तेव्हा तिचा जप ८० वर आला होता  ती जपसंख्या  १०८ पूर्ण करण्यासाठी,तो जप करत करत, एका हातात राणीची तलवार व एका हातात  आपली तलवार घेऊन ती ब्रिटिशांबरोबर लढू लागली.व जप पूर्ण होताक्षणीच
त्या वीरांगनेने राणीची पवित्र तलवार
गंगेत अर्पण केली.

अन् त्याचक्षणी ब्रिटिशांची गोळी लागून
ती गंगेत पडली. तशाही स्थितीत तिने  गंगेत दूर वाहत जाऊन,अत्यंत आनंदाने व कृतार्थाने   अखेरचा श्वास घेतला.

काय जबरदस्त प्रेम होते  तिचे झाशीच्या राणीवर! खरंच तिला त्रिवार प्रणाम!
आणि म्हणूनच ह्याला इतिहासात तोड नाही.

तिची राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी विसर्जन
करण्यासाठीची धडपड भक्तीरसाने पूर्ण ओथंबलेली होती.आणि म्हणूनच  तो अनंत शक्तिशाली परमात्मा तिच्या पाठीशी होताच!

तिचा पराकोटीचा भाव म्हणजे
तिला वीरांगना राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी व तलवार लपूनछपून विसर्जित करणे
मान्य नव्हते.तिच्या मनाला ते पटणारच नव्हते.म्हणूनच तिने सैनिकी वेश धारण केला होता.व म्हणून तिच्या मनात सुखद भावना, अभिमानाची भावना  व पावित्र्याची भावना एकाच वेळी उचंबळून वर येत होत्या.व
त्या भावनांमध्ये तिच्याकडून तिच्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या राणीची शेवटची इच्छा पूर्ण होणार, ह्या कृतार्थतेचा आनंद मिसळलेला होता.

No comments:

Post a Comment