Wednesday 29 November 2017

Wednesday 15 November 2017

मानवी मनाची भरकट

"प्रत्येक मानवाची स्थिती ह्या तारामती सारखीच असते .तो सतत नवीन गरजा निर्माण करत राहतो, 
सतत नवीन गोष्ट शोधत राहतो आणि आसक्तीपोटी होणाऱ्या त्याच्या ह्या अंतहीन प्रवासात त्याची दिशाहीन भरकट होत राहते . "

सदगुरु श्री अनिरुद्ध बापू (दैनिक प्रत्यक्ष - अग्रलेख १४१५ तारीख ९ नोव्हेंबर२०१७.


-
ही आम्हा प्रत्येकाची गत आहे .
दिशाहीन होणे जणू आम्ही ठरवलेलेच आहे .
खरी आपल्या फायद्याची दिशा माहित असून देखील आम्ही त्या दिशेने जात नाही आणि स्वतःची कायम फसवणूक करून घेत राहतो .

सदगुरु आम्हाला वेळोवेळी दिशा दाखवितात मार्गदर्शन करतात . त्याच दिशेने आम्ही चाललो तर आमची " दहा दिशांनी फिस्कटली जीवनाची घडी " अशी आमची अवस्था होत नाही । उलट " आता कैची आमावस्या नित्य अनिरुद्ध पौर्णिमा " असा मीना वैनींनी वर्णिलेला  जीवनाचा  जल्लोष होतो .
हरि ओम श्री राम अंबज्ञ ।।
- डॉ. निशिकांतसिंह विभुते