Showing posts with label झाशीची राणी लक्ष्मीबाई. Show all posts
Showing posts with label झाशीची राणी लक्ष्मीबाई. Show all posts

Sunday, November 23, 2025

मोतीबाई यांचे बलिदान आणि शौर्यगाथा कथामंजिरी 4-3-22 -MadArt369 Illustration

 


आजचा अग्रलेख म्हणजे जीवाला जीव लावणारा "जीवश्च-कंठश्च" आप्त/मित्र कसा असतो याची परिभाषा समजावणारा आहे.


*मोतीबाईच्या शौर्याला आणि कृतज्ञतेला खरंच इतिहासात तोड नाही.*

* आपल्या आप्तजणांच्या सुरक्षिततेची खात्री करून मगच टोकाचे पाऊल उचलणारी मोतीबाई...

* आपल्या राणी लक्ष्मीबाईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपला 108 जपसंख्येचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावणारी मोतीबाई...

शत्रूचा थरकाप उडविणाऱ्या या विरांगनेचा थरारक इतिहास अजून कुठे वाचायला मिळेल..

दै. 'प्रत्यक्ष' एकमेव जो इतिहासात दडलेली पाने उलगडून मार्गदर्शन करणारा जिवश्च-कंठश्च मित्र...
🙏🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय
🙏🙏🙏


४/३/२२

आजच्या कथामंजिरीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, (जी ग्रंथात सांगितलेली आहे) ती ही की,
खरी ताकद आपल्या इष्ट देवतेच्या अस्तित्वाच्या स्मरणात आहे.

इतिहासात ज्यांच्याकडून शौर्य घडले
ते सर्व भक्तच होते.
शिवाजी महाराज,महाराणा प्रतापसिंह,महात्मा गांधी,नेताजी बोस,
विवेकानंद,पहिला बाजीराव हे सर्वच भक्ती करत होते.

झाशीची राणी लक्ष्मीबाईही भक्ती करत होती.तिचा अत्यंत आवडता व नित्य जप होता,
ॐ नमो भगवते वासुदेवाय!

आणि मोतीबाई तिच्या तालमीत तयार झालेली,तिच्या संस्कारात तयार झालेली.
ती  मोतीबाई भक्तीशिवाय कशी राहू शकेल? तो जप १०८ वेळा करूनच ती  राणीची पवित्र तलवार गंगेला अर्पण करणार होती.
आणि ती त्यावेळी  वृद्ध विधवेच्या
वेशात नव्हती,तर ती झाशीच्या सैनिकी वेशात होती.

खरंतर विधवेच्या वेशात तिला ब्रिटिशांकडून कुठलाच धोका नव्हता.

पण त्या सैनिकी वेशामुळे तिला ब्रिटिशांच्या एका भारतीय सैनिकाने ओळखले.व तेव्हा तिचा जप ८० वर आला होता  ती जपसंख्या  १०८ पूर्ण करण्यासाठी,तो जप करत करत, एका हातात राणीची तलवार व एका हातात  आपली तलवार घेऊन ती ब्रिटिशांबरोबर लढू लागली.व जप पूर्ण होताक्षणीच
त्या वीरांगनेने राणीची पवित्र तलवार
गंगेत अर्पण केली.

अन् त्याचक्षणी ब्रिटिशांची गोळी लागून
ती गंगेत पडली. तशाही स्थितीत तिने  गंगेत दूर वाहत जाऊन,अत्यंत आनंदाने व कृतार्थाने   अखेरचा श्वास घेतला.

काय जबरदस्त प्रेम होते  तिचे झाशीच्या राणीवर! खरंच तिला त्रिवार प्रणाम!
आणि म्हणूनच ह्याला इतिहासात तोड नाही.

तिची राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी विसर्जन
करण्यासाठीची धडपड भक्तीरसाने पूर्ण ओथंबलेली होती.आणि म्हणूनच  तो अनंत शक्तिशाली परमात्मा तिच्या पाठीशी होताच!

तिचा पराकोटीचा भाव म्हणजे
तिला वीरांगना राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी व तलवार लपूनछपून विसर्जित करणे
मान्य नव्हते.तिच्या मनाला ते पटणारच नव्हते.म्हणूनच तिने सैनिकी वेश धारण केला होता.व म्हणून तिच्या मनात सुखद भावना, अभिमानाची भावना  व पावित्र्याची भावना एकाच वेळी उचंबळून वर येत होत्या.व
त्या भावनांमध्ये तिच्याकडून तिच्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या राणीची शेवटची इच्छा पूर्ण होणार, ह्या कृतार्थतेचा आनंद मिसळलेला होता.

कथमंजिरी 4-3-21 -मोतीबाई यांचा (अस्थीकलश अर्पणासाठी) काशी प्रवास आणि रामभद्रांची साथ



 .. अग्रलेख.... वाचता वाचता जसजसा शेवट जवळ येतो... नकळत भावूक करून डोळ्याच्या कडा ओला करून जातो.. कोणीतरी आपलं स्वतःचं जीवश्चकंठश्च ह्या अग्रलेखाद्वारे इतिहासाच्या दडवलेल्या पानातून बाहेर येऊ पाहतंय आणि आपल्याशी हितगुज करण्यास उत्सुक आहे असं वाटतंय.


तो रामभद्र आपल्या भक्ताला एकटं राहू देत नाही... कुठून कशी मदत पुरवतो... हे वाचताना भावुक व्हायलाच होतं.

खरंच वाचायला हवा हा आपला शौर्याने आणि ध्येयाने ओतप्रोत भरलेला इतिहास.

🙏🙏🙏  : MadArt_369

आजची कथा मंजिरी 3- २३

बघा त्या काळात साधे कर्म की जे माणूस मेल्यानंतर त्याच्या अस्थी त्या माणसाच्या मनाप्रमाणे विसर्जित करणे सुद्धा कित्ती कठीण बाब होती पण तरी सुद्धा राणी लक्ष्मी बाई च्या इच्छेनुसार  करायचे शेवटचे कर्म , ह्या मोतीबाई ने अगदी सबुरीने  मंत्र जप करीत  अगदी कोणालाही कळू नये हे सांभाळून
आणि काशी च्या गंगेत राणी लक्ष्मीबाईचा अस्थी आणि रक्त लागलेला फेटा आणि त्या
वीरांगनेची तलवार कोणत्याही ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून गंगेत सरते शेवटी विसर्जित करूनच स्वतः देखील त्या गंगे त विसर्जित झाली..
तिचे कर्म आणि तिचा हा आनंद खरोखर वाखाणण्याजोगा आहे. तिचा परमेश्वरी विश्वास आणि त्या मुळेच तिचे धैर्य आणि सबुरी आणि नेटाने काशीच्या गंगे. पर्यंतचा प्रवास  हा काशीबाई च्या इच्छेनुसार झाला 🙏❤️
ह्या वीरांगनाना सलाम !!!!!
प्रखर देशभक्ती !!!
आजच्या समाजाला ह्या ज्योतीच्या प्रकाशाची गरज आहे. 🙏

Monday, November 17, 2025

ब्रिगेडियर स्मिथ ला शिक्षा । कथामंजिरी 4- 3-20 ( MadArt_369 Illustration)

 

ब्रिगेडियर स्मिथ ला शिक्षा । कथामंजिरी 4- 3-20 ( MadArt_369 Illustration)


राणी लक्ष्मीबाईच्या शेवटच्या क्षणांची आठवण काढत व हृदयात असीम धैर्य व शौर्य उत्पन्न करीत ह्या चौघांनी गद्दार व फितूरांना यमसदनी पाठवूनच आपला देह त्यागला.

असे लढवय्ये होते म्हणूनच स्वातंत्र्ययुद्धाची ज्योत पेटत राहिली.

अशा ह्या भारतमातेच्या शूरवीर पुत्रांना मानाचा मुजरा!
🙏🙏🙏

Wednesday, November 12, 2025

दुल्हेराव फितुरास शिक्षा ! कथामंजिरी ४- ३- १९ | MadArt_369 Illustration

 

Jhashichi Rani Laxmibai Kathamanjiri

खऱ्या अर्थाने राणी लक्ष्मीबाई आणि तीचे कार्य जाणून घ्यायचे असेल तर आपला दै. 'प्रत्यक्ष' वाचायलाचा हवा. मृत्यूपूर्वीच अशी काही माणसे जोडून ठेवली होती की त्यांचे कार्य वाचून राणी लक्ष्मीबाईचे महात्म्य आपल्यासमोर नव्याने उलगडतंय असं वाटतंय...


खरंच इतिहासाची ही पाने दै. 'प्रत्यक्ष'मधून चाळताना खूप काही दडलेल्या थोडक्यात परंतु महत्त्वाच्या गोष्टी समजतायेत.

: MadArt_369

Sunday, November 2, 2025

झाशीची राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका ) आणि पिता मोरोपंत तांबे देशभक्ती आणि देशासाठी बलिदानाची शौर्यगाथा । कथामंजिरी 4-3-16 । MadArt369 Illustration

 

झाशीची राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका ) आणि पिता मोरोपंत तांबे देशभक्ती आणि देशासाठी बलिदानाची शौर्यगाथा । कथामंजिरी 4-3-16 । MadArt369 Illustration

केवळ देव... देश आणि धर्मासाठी...

स्वतःच्या अंतिम संस्कारांची तयारी करूनच दोघांनीही मृत्यूला मिठी घातली...

हे वाक्य वाचून अंगावर शहारा येतो.. खरंच धन्य तो पिता आणि अतिधन्य त्याची कन्या राणी लक्ष्मीबाई... 🙏🙏🙏

अशा वीर पिता-कन्येचा घात करणाऱ्या फितूरांचा आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा वध झाल्याशिवाय या वीरांना पुष्पांजली वाहिली जाऊ शकत नाही...

जय राणी लक्ष्मीबाई!
जय भारतमाता!

🙏🙏🙏

Saturday, November 1, 2025

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची अमर शौर्यगाथा ( कथामंजिरी ४-३-15) ( MadArt_369 Illustration)

 

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची अमर शौर्यगाथा ( कथामंजिरी ४-३-15) ( MadArt_369 Illustration)

निःशब्द आणि सुन्न करणारा अग्रलेख 🙏🙏🙏


राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू कधी होऊच शकत नाही...


ती आजही भारतमातेच्या हृदयात आहेच आहे 


आणि सदैव असणारच आहे.


🙏🙏🙏

राणी लक्ष्मीबाईला भावपूर्ण वंदन.

🙏🙏🙏

Wednesday, October 29, 2025

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची रणनीति आणि शौर्यगाथा इतिहास ( कथामंजिरी ४-३-१४) (Mad_Art.369 Illustration)

 

Jhashichi rani Lakshmibai Shauryagatha

मरतेवेळी कोणतीही व्यक्ती सत्यच बोलते परंतु आपल्या राणीला वाचविण्यासाठी धादान्त असत्य बोलणाऱ्या झालकारीबाईचे शौर्य आणि बलिदान पाहून मन हेलावल्याशिवाय राहत नाही..


प्रिय व्यक्तींचे बलिदान... प्रजेचे हाल... राज्याचे नुकसान होत होते... अंगावर 59 खोल जखमा... तरीही "ती" माघार घेत नव्हती... 


"मेरी झांसी नही दूंगी" हे फक्त बोलण्यापुरते शब्द नव्हते तर... .... ... 


*..."ती"ने जिद्द सोडली नाही.*


राणी लक्ष्मीबाई, वय वर्ष फक्त 20 असावं.. परंतु पराक्रम मात्र गगणाला भिडणारा...


अग्रलेख वाचतोय की इतिहासाच्या पुस्तकाची हरवलेली पाने वाचतोय असं वाटतंय.. हा इतिहास शालेय पाठयपुस्तकात असायलाच हवा... नाही कां?

🙏🙏🙏

Sunday, October 26, 2025

वीरांगना झलकारीबाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा । (कथामंजिरी 4-3-13) । Mad.Art_369 Illustration

Jhalkaribai Jhashichi Rahi Laxmibai yanchi Shaurygatha
अंगात देशप्रेमाचं सळसळतं रक्त असलं की काय पराक्रम गाजवला जातो ह्याची झलक आजचा अग्रलेख झलकारीबाईच्या शौर्यगाथेतून दाखवून देतोय...

खरोखरचं अचूक शब्द आहेत झलकारीबाईसाठी...

*आकर रण में ललकारी थी*
    *वह झांसी की झलकारी थी*

🙏🙏🙏
 

Tuesday, October 21, 2025

मेरी झाँसी नहीं दूँगी !!! झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा । (कथमंजिरी 4-3-12 illustration by Mad.Art_369))

 *"कधी ना कधी मरायचे तर प्रत्येकाला आहे....*

*... ... मग मरायचेच तर.... ... ..."*


भारावून टाकणारे आणि जोशपूर्ण असे राणी लक्ष्मीबाईचे तेजस्वी वाणीने व विचारांनी भरलेले भाषण आजच्या अग्रलेखात वाचल्यावर आपल्या ह्या देशाचा इतिहास गौरवशाली कां आहे ह्याची साक्ष पटते. 


देश आणि धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचा प्राण जाणार हे माहित असतानाही पुढील काळातील प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणादायक भाषण देणाऱ्या राणी लक्ष्मीबाईला कोटी कोटी प्रणाम!

🙏

Jhanshichi Rani Lakshmibai

Sunday, October 19, 2025

1857-1858: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा । कथामंजिरी 4-3-11 । Mad.Art_369 Illustration

 

Jhashichi Rani Laxmibai

19-10-2025

------------------

*कथा 3-11*

------------------

1857....

लॉर्ड डलहौशी ने दत्तकविधानासंदर्भात आज्ञापत्र काढल्यावर त्याच रात्री झाशीमध्ये काय घडले....

आणि...

1858.....

राणी लक्ष्मीबाईच्या 'दुर्गादला'तील वी्रांगणांचा पराक्रम जाणून घेण्यासाठी आजचा अग्रलेख वाचायलाच हवा... 

नाही कां? 😊


🙏

झाशीची राणी लक्ष्मीबाई : मनकर्णिका तांबे । कथामंजिरी 4-3-10 (Mad.Art_369 Illustration)

 16-10-2025

-

Jhashichi Rani Laxmibai Mankarnika

-----------------

*कथा 3-10*

------------------

संपूर्ण राजवैभव नशिबी होतं तरी विविध व्याधिंनी पीडलेला नवरा व अल्पायुषी ठरलेला पुत्र अशा दुःखातून बाहेर पडताना ब्रिटिशांमुळे होणारे राज्याच्या नागरिकांचे हाल मात्र राणी लक्ष्मीबाईला पाहवत नव्हते. आणि त्यासाठी तिने... ... ... ....


अशा ह्या धुरंधर मनकर्णिकेची चित्तथरारक गाथा दै. "प्रत्यक्ष"च्या अग्रलेखांतून वाचायला मिळतेय.. 


अंबज्ञ् बापू...


नाथसंविध् 

🙏