Thursday, November 27, 2025

लोकमान्य टिळक : सार्वजनिक 'गणेशोत्सव' व "शिवाजी महाराजांची जयंती" सुरु । लाल-बाल-पाल ।

 

सार्वजनिक 'गणेशोत्सव' व "शिवाजी महाराजांची जयंती"

1858 नंतर भारतीयांच्या मनात बसलेली दहशत कमी करण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन चर्चा घडणे आवश्यक आहे हे ओळखून टिळकांनी सार्वजनिक 'गणेशोत्सव' व "शिवाजी महाराजांची जयंती" सुरु केली. ह्यामुळे महाराष्ट्र, बंगाल, पंजाबमधून क्रांतिकारकांचे नवनवे गट टिळकांना येऊन भेटू लागले...


...आणि मग भारतातील प्रत्येक ब्रिटिश ऑफिसर, व्हाईसरॉय तसेच ब्रिटनमध्ये बसलेल्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला हादरा देणाऱ्या घटना घडू लागल्या...

आणि...

'गरीब कामगारांचा नेता' अशा उपहासालाही गौरव मानून टिळकांच्या कार्याने जोरदार वेग घेतला...

🙏🙏🙏

बाळ गंगाधर टिळक : भारतातील असंतोषाचे एकमेव जनक

 *भारतातील असंतोषाचे एकमेव जनक...*

बाळ गंगाधर टिळक


Tilak is the father of Indian unrest and freedom fight.

बाळ गंगाधर टिळक यांच्या दोन तोफा म्हणजेच 'केसरी (मराठी) व 'मराठा (english) ही दोन वृत्तपत्रे ब्रिटिश अत्याचाऱ्यांच्या विरोधात कडाडू व धडाडू लागली .... .... .....

*.... ... आणि 1858 साली विझवला गेलेला सशस्त्र क्रांतीचा मार्ग पुन्हा एकदा धैर्याने बांधला जाऊ लागला...*

🙏🙏🙏

Sunday, November 23, 2025

या डोळयांची दोन पाखरे, फिरतील तुमच्या भवती

 चित्रपट : पाठलाग (१९६४)

गीत : ग. दी. माडगुळकर
संगीत : दत्ता डावजेकर
गायिका : आशा भोसले

या डोळयांची दोन पाखरे, फिरतील तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील, असा कुठे ही जगती || ध्रु ||

दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासाविण नकोच यांना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यास नभांगण, घरकुल तुमची छाती || १ ||

सावलीत ही बसतील वेडी, प्रीतीच्या दडूनी
एका अश्रूमाजी तुमच्या जातील पण बुडुनी 
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, ही तर अक्षय नाती || २ ||

बाळ गंगाधर टिळक - कथामंजिरी -4-3-24

 



🔹करारी चेहरा...

     🔹खणखणीत आवाज...
🔹स्पष्ट विचार...
      🔹लढाऊ बाणेदार स्वभाव...
अशी ओळख असलेला व
अन्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहणारा एक नेता राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे इ. स्वातंत्र्यवीरांनंतर भारतमातेच्या पोटी उदयास आला...

भारताचा भाग्यविधाता बनू शकतील असे... परंतु हे सर्व करताना *भगवंताशी अनुसंधान साधणे* सर्वोच्च आहे असे मत असलेले

बाळ गंगाधर टिळक

🙏🙏🙏 : MadArt-369

ब्रिटिशांची धूर्त चाल- राणीचा जाहीरनामा- कथामंजिरी 4- 3- 33 - MadArt_369 Illustration

 

गेले काही दिवस अग्रलेखातून सुरु असलेले राणी लक्ष्मीबाई आणि तिच्या जीवाश्च कंठश्च साथीदारांनी केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाचे पवित्र स्मरण आणि हादरवून सोडणारे स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य प्रत्येक देशभक्ताला नतमस्तक व्हायला भाग पाडते....

पुढे आलेल्या व्हिकटो्रिया राणीच्या जाहीरनाम्यामागचा हेतू वाचला की मन खिन्न होते
परंतु...
भारतमातेला ब्रिटिशांच्या या धूर्त बेडीतून मुक्त करण्यासाठी त्या स्वयंभगवनाच्या कृपेनें 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील 'चिखली' नावाच्या छोट्याशा गावी एका भारतमातेच्या सुपुत्राचा जन्म झालेलाच होता...

नाम तो याद होगा नां!

*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक*
🙏🙏🙏


मोतीबाई यांचे बलिदान आणि शौर्यगाथा कथामंजिरी 4-3-22 -MadArt369 Illustration

 


आजचा अग्रलेख म्हणजे जीवाला जीव लावणारा "जीवश्च-कंठश्च" आप्त/मित्र कसा असतो याची परिभाषा समजावणारा आहे.


*मोतीबाईच्या शौर्याला आणि कृतज्ञतेला खरंच इतिहासात तोड नाही.*

* आपल्या आप्तजणांच्या सुरक्षिततेची खात्री करून मगच टोकाचे पाऊल उचलणारी मोतीबाई...

* आपल्या राणी लक्ष्मीबाईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपला 108 जपसंख्येचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावणारी मोतीबाई...

शत्रूचा थरकाप उडविणाऱ्या या विरांगनेचा थरारक इतिहास अजून कुठे वाचायला मिळेल..

दै. 'प्रत्यक्ष' एकमेव जो इतिहासात दडलेली पाने उलगडून मार्गदर्शन करणारा जिवश्च-कंठश्च मित्र...
🙏🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय
🙏🙏🙏


४/३/२२

आजच्या कथामंजिरीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, (जी ग्रंथात सांगितलेली आहे) ती ही की,
खरी ताकद आपल्या इष्ट देवतेच्या अस्तित्वाच्या स्मरणात आहे.

इतिहासात ज्यांच्याकडून शौर्य घडले
ते सर्व भक्तच होते.
शिवाजी महाराज,महाराणा प्रतापसिंह,महात्मा गांधी,नेताजी बोस,
विवेकानंद,पहिला बाजीराव हे सर्वच भक्ती करत होते.

झाशीची राणी लक्ष्मीबाईही भक्ती करत होती.तिचा अत्यंत आवडता व नित्य जप होता,
ॐ नमो भगवते वासुदेवाय!

आणि मोतीबाई तिच्या तालमीत तयार झालेली,तिच्या संस्कारात तयार झालेली.
ती  मोतीबाई भक्तीशिवाय कशी राहू शकेल? तो जप १०८ वेळा करूनच ती  राणीची पवित्र तलवार गंगेला अर्पण करणार होती.
आणि ती त्यावेळी  वृद्ध विधवेच्या
वेशात नव्हती,तर ती झाशीच्या सैनिकी वेशात होती.

खरंतर विधवेच्या वेशात तिला ब्रिटिशांकडून कुठलाच धोका नव्हता.

पण त्या सैनिकी वेशामुळे तिला ब्रिटिशांच्या एका भारतीय सैनिकाने ओळखले.व तेव्हा तिचा जप ८० वर आला होता  ती जपसंख्या  १०८ पूर्ण करण्यासाठी,तो जप करत करत, एका हातात राणीची तलवार व एका हातात  आपली तलवार घेऊन ती ब्रिटिशांबरोबर लढू लागली.व जप पूर्ण होताक्षणीच
त्या वीरांगनेने राणीची पवित्र तलवार
गंगेत अर्पण केली.

अन् त्याचक्षणी ब्रिटिशांची गोळी लागून
ती गंगेत पडली. तशाही स्थितीत तिने  गंगेत दूर वाहत जाऊन,अत्यंत आनंदाने व कृतार्थाने   अखेरचा श्वास घेतला.

काय जबरदस्त प्रेम होते  तिचे झाशीच्या राणीवर! खरंच तिला त्रिवार प्रणाम!
आणि म्हणूनच ह्याला इतिहासात तोड नाही.

तिची राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी विसर्जन
करण्यासाठीची धडपड भक्तीरसाने पूर्ण ओथंबलेली होती.आणि म्हणूनच  तो अनंत शक्तिशाली परमात्मा तिच्या पाठीशी होताच!

तिचा पराकोटीचा भाव म्हणजे
तिला वीरांगना राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी व तलवार लपूनछपून विसर्जित करणे
मान्य नव्हते.तिच्या मनाला ते पटणारच नव्हते.म्हणूनच तिने सैनिकी वेश धारण केला होता.व म्हणून तिच्या मनात सुखद भावना, अभिमानाची भावना  व पावित्र्याची भावना एकाच वेळी उचंबळून वर येत होत्या.व
त्या भावनांमध्ये तिच्याकडून तिच्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या राणीची शेवटची इच्छा पूर्ण होणार, ह्या कृतार्थतेचा आनंद मिसळलेला होता.

कथमंजिरी 4-3-21 -मोतीबाई यांचा (अस्थीकलश अर्पणासाठी) काशी प्रवास आणि रामभद्रांची साथ



 .. अग्रलेख.... वाचता वाचता जसजसा शेवट जवळ येतो... नकळत भावूक करून डोळ्याच्या कडा ओला करून जातो.. कोणीतरी आपलं स्वतःचं जीवश्चकंठश्च ह्या अग्रलेखाद्वारे इतिहासाच्या दडवलेल्या पानातून बाहेर येऊ पाहतंय आणि आपल्याशी हितगुज करण्यास उत्सुक आहे असं वाटतंय.


तो रामभद्र आपल्या भक्ताला एकटं राहू देत नाही... कुठून कशी मदत पुरवतो... हे वाचताना भावुक व्हायलाच होतं.

खरंच वाचायला हवा हा आपला शौर्याने आणि ध्येयाने ओतप्रोत भरलेला इतिहास.

🙏🙏🙏  : MadArt_369

आजची कथा मंजिरी 3- २३

बघा त्या काळात साधे कर्म की जे माणूस मेल्यानंतर त्याच्या अस्थी त्या माणसाच्या मनाप्रमाणे विसर्जित करणे सुद्धा कित्ती कठीण बाब होती पण तरी सुद्धा राणी लक्ष्मी बाई च्या इच्छेनुसार  करायचे शेवटचे कर्म , ह्या मोतीबाई ने अगदी सबुरीने  मंत्र जप करीत  अगदी कोणालाही कळू नये हे सांभाळून
आणि काशी च्या गंगेत राणी लक्ष्मीबाईचा अस्थी आणि रक्त लागलेला फेटा आणि त्या
वीरांगनेची तलवार कोणत्याही ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून गंगेत सरते शेवटी विसर्जित करूनच स्वतः देखील त्या गंगे त विसर्जित झाली..
तिचे कर्म आणि तिचा हा आनंद खरोखर वाखाणण्याजोगा आहे. तिचा परमेश्वरी विश्वास आणि त्या मुळेच तिचे धैर्य आणि सबुरी आणि नेटाने काशीच्या गंगे. पर्यंतचा प्रवास  हा काशीबाई च्या इच्छेनुसार झाला 🙏❤️
ह्या वीरांगनाना सलाम !!!!!
प्रखर देशभक्ती !!!
आजच्या समाजाला ह्या ज्योतीच्या प्रकाशाची गरज आहे. 🙏

Monday, November 17, 2025

ब्रिगेडियर स्मिथ ला शिक्षा । कथामंजिरी 4- 3-20 ( MadArt_369 Illustration)

 

ब्रिगेडियर स्मिथ ला शिक्षा । कथामंजिरी 4- 3-20 ( MadArt_369 Illustration)


राणी लक्ष्मीबाईच्या शेवटच्या क्षणांची आठवण काढत व हृदयात असीम धैर्य व शौर्य उत्पन्न करीत ह्या चौघांनी गद्दार व फितूरांना यमसदनी पाठवूनच आपला देह त्यागला.

असे लढवय्ये होते म्हणूनच स्वातंत्र्ययुद्धाची ज्योत पेटत राहिली.

अशा ह्या भारतमातेच्या शूरवीर पुत्रांना मानाचा मुजरा!
🙏🙏🙏

Wednesday, November 12, 2025

दुल्हेराव फितुरास शिक्षा ! कथामंजिरी ४- ३- १९ | MadArt_369 Illustration

 

Jhashichi Rani Laxmibai Kathamanjiri

खऱ्या अर्थाने राणी लक्ष्मीबाई आणि तीचे कार्य जाणून घ्यायचे असेल तर आपला दै. 'प्रत्यक्ष' वाचायलाचा हवा. मृत्यूपूर्वीच अशी काही माणसे जोडून ठेवली होती की त्यांचे कार्य वाचून राणी लक्ष्मीबाईचे महात्म्य आपल्यासमोर नव्याने उलगडतंय असं वाटतंय...


खरंच इतिहासाची ही पाने दै. 'प्रत्यक्ष'मधून चाळताना खूप काही दडलेल्या थोडक्यात परंतु महत्त्वाच्या गोष्टी समजतायेत.

: MadArt_369

Saturday, November 8, 2025

लालाभाऊ बक्षी Kathamanjiri 4-3-18 MadArt_369 Illustration

Lalabhau Bakshi
ाठीच्या कण्यावर तलवारीच्या वाराची खूप खोल जखम असताना व सतत रक्तस्राव होत असताना उपचारांची पर्वा न करता केवळ राणी लक्ष्मीबाईसोबत गद्दारी करणाऱ्यांना संपवण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या वयोवृद्ध *"लालाभाऊ बक्षी"* यांची शौर्यगाथा आजच्या अग्रलेखात वाचवयास मिळतेय..

 

कथामंजिरी ४-३-१७ काशीबाई कुंबिन MadArt_369 Illustration

 

राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतरचा इतिहास कुठल्या पाठयपुस्तकात दिलाय मला माहित नाही... परंतु दै. प्रत्यक्ष ही माहिती आणि जाणीव करून देतोय स्वातंत्र्यलढा कसा लढला गेला... राणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 'दुर्गादल" आणि "महादेवशिवदल" कसे सज्ज झाले आणि कोणत्या परिस्थितीत... हे आजच्या अग्रलेखातून वाचावयास मिळतेय.

Sunday, November 2, 2025

झाशीची राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका ) आणि पिता मोरोपंत तांबे देशभक्ती आणि देशासाठी बलिदानाची शौर्यगाथा । कथामंजिरी 4-3-16 । MadArt369 Illustration

 

झाशीची राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका ) आणि पिता मोरोपंत तांबे देशभक्ती आणि देशासाठी बलिदानाची शौर्यगाथा । कथामंजिरी 4-3-16 । MadArt369 Illustration

केवळ देव... देश आणि धर्मासाठी...

स्वतःच्या अंतिम संस्कारांची तयारी करूनच दोघांनीही मृत्यूला मिठी घातली...

हे वाक्य वाचून अंगावर शहारा येतो.. खरंच धन्य तो पिता आणि अतिधन्य त्याची कन्या राणी लक्ष्मीबाई... 🙏🙏🙏

अशा वीर पिता-कन्येचा घात करणाऱ्या फितूरांचा आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा वध झाल्याशिवाय या वीरांना पुष्पांजली वाहिली जाऊ शकत नाही...

जय राणी लक्ष्मीबाई!
जय भारतमाता!

🙏🙏🙏

Saturday, November 1, 2025

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची अमर शौर्यगाथा ( कथामंजिरी ४-३-15) ( MadArt_369 Illustration)

 

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची अमर शौर्यगाथा ( कथामंजिरी ४-३-15) ( MadArt_369 Illustration)

निःशब्द आणि सुन्न करणारा अग्रलेख 🙏🙏🙏


राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू कधी होऊच शकत नाही...


ती आजही भारतमातेच्या हृदयात आहेच आहे 


आणि सदैव असणारच आहे.


🙏🙏🙏

राणी लक्ष्मीबाईला भावपूर्ण वंदन.

🙏🙏🙏