Sunday, November 23, 2025

कथमंजिरी 4-3-21 -मोतीबाई यांचा (अस्थीकलश अर्पणासाठी) काशी प्रवास आणि रामभद्रांची साथ



 .. अग्रलेख.... वाचता वाचता जसजसा शेवट जवळ येतो... नकळत भावूक करून डोळ्याच्या कडा ओला करून जातो.. कोणीतरी आपलं स्वतःचं जीवश्चकंठश्च ह्या अग्रलेखाद्वारे इतिहासाच्या दडवलेल्या पानातून बाहेर येऊ पाहतंय आणि आपल्याशी हितगुज करण्यास उत्सुक आहे असं वाटतंय.


तो रामभद्र आपल्या भक्ताला एकटं राहू देत नाही... कुठून कशी मदत पुरवतो... हे वाचताना भावुक व्हायलाच होतं.

खरंच वाचायला हवा हा आपला शौर्याने आणि ध्येयाने ओतप्रोत भरलेला इतिहास.

🙏🙏🙏  : MadArt_369

आजची कथा मंजिरी 3- २३

बघा त्या काळात साधे कर्म की जे माणूस मेल्यानंतर त्याच्या अस्थी त्या माणसाच्या मनाप्रमाणे विसर्जित करणे सुद्धा कित्ती कठीण बाब होती पण तरी सुद्धा राणी लक्ष्मी बाई च्या इच्छेनुसार  करायचे शेवटचे कर्म , ह्या मोतीबाई ने अगदी सबुरीने  मंत्र जप करीत  अगदी कोणालाही कळू नये हे सांभाळून
आणि काशी च्या गंगेत राणी लक्ष्मीबाईचा अस्थी आणि रक्त लागलेला फेटा आणि त्या
वीरांगनेची तलवार कोणत्याही ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून गंगेत सरते शेवटी विसर्जित करूनच स्वतः देखील त्या गंगे त विसर्जित झाली..
तिचे कर्म आणि तिचा हा आनंद खरोखर वाखाणण्याजोगा आहे. तिचा परमेश्वरी विश्वास आणि त्या मुळेच तिचे धैर्य आणि सबुरी आणि नेटाने काशीच्या गंगे. पर्यंतचा प्रवास  हा काशीबाई च्या इच्छेनुसार झाला 🙏❤️
ह्या वीरांगनाना सलाम !!!!!
प्रखर देशभक्ती !!!
आजच्या समाजाला ह्या ज्योतीच्या प्रकाशाची गरज आहे. 🙏

Monday, November 17, 2025

ब्रिगेडियर स्मिथ ला शिक्षा । कथामंजिरी 4- 3-20 ( MadArt_369 Illustration)

 

ब्रिगेडियर स्मिथ ला शिक्षा । कथामंजिरी 4- 3-20 ( MadArt_369 Illustration)


राणी लक्ष्मीबाईच्या शेवटच्या क्षणांची आठवण काढत व हृदयात असीम धैर्य व शौर्य उत्पन्न करीत ह्या चौघांनी गद्दार व फितूरांना यमसदनी पाठवूनच आपला देह त्यागला.

असे लढवय्ये होते म्हणूनच स्वातंत्र्ययुद्धाची ज्योत पेटत राहिली.

अशा ह्या भारतमातेच्या शूरवीर पुत्रांना मानाचा मुजरा!
🙏🙏🙏

Wednesday, November 12, 2025

दुल्हेराव फितुरास शिक्षा ! कथामंजिरी ४- ३- १९ | MadArt_369 Illustration

 

Jhashichi Rani Laxmibai Kathamanjiri

खऱ्या अर्थाने राणी लक्ष्मीबाई आणि तीचे कार्य जाणून घ्यायचे असेल तर आपला दै. 'प्रत्यक्ष' वाचायलाचा हवा. मृत्यूपूर्वीच अशी काही माणसे जोडून ठेवली होती की त्यांचे कार्य वाचून राणी लक्ष्मीबाईचे महात्म्य आपल्यासमोर नव्याने उलगडतंय असं वाटतंय...


खरंच इतिहासाची ही पाने दै. 'प्रत्यक्ष'मधून चाळताना खूप काही दडलेल्या थोडक्यात परंतु महत्त्वाच्या गोष्टी समजतायेत.

: MadArt_369

Saturday, November 8, 2025

लालाभाऊ बक्षी Kathamanjiri 4-3-18 MadArt_369 Illustration

Lalabhau Bakshi
ाठीच्या कण्यावर तलवारीच्या वाराची खूप खोल जखम असताना व सतत रक्तस्राव होत असताना उपचारांची पर्वा न करता केवळ राणी लक्ष्मीबाईसोबत गद्दारी करणाऱ्यांना संपवण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या वयोवृद्ध *"लालाभाऊ बक्षी"* यांची शौर्यगाथा आजच्या अग्रलेखात वाचवयास मिळतेय..

 

कथामंजिरी ४-३-१७ काशीबाई कुंबिन MadArt_369 Illustration

 

राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतरचा इतिहास कुठल्या पाठयपुस्तकात दिलाय मला माहित नाही... परंतु दै. प्रत्यक्ष ही माहिती आणि जाणीव करून देतोय स्वातंत्र्यलढा कसा लढला गेला... राणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 'दुर्गादल" आणि "महादेवशिवदल" कसे सज्ज झाले आणि कोणत्या परिस्थितीत... हे आजच्या अग्रलेखातून वाचावयास मिळतेय.

Sunday, November 2, 2025

झाशीची राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका ) आणि पिता मोरोपंत तांबे देशभक्ती आणि देशासाठी बलिदानाची शौर्यगाथा । कथामंजिरी 4-3-16 । MadArt369 Illustration

 

झाशीची राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका ) आणि पिता मोरोपंत तांबे देशभक्ती आणि देशासाठी बलिदानाची शौर्यगाथा । कथामंजिरी 4-3-16 । MadArt369 Illustration

केवळ देव... देश आणि धर्मासाठी...

स्वतःच्या अंतिम संस्कारांची तयारी करूनच दोघांनीही मृत्यूला मिठी घातली...

हे वाक्य वाचून अंगावर शहारा येतो.. खरंच धन्य तो पिता आणि अतिधन्य त्याची कन्या राणी लक्ष्मीबाई... 🙏🙏🙏

अशा वीर पिता-कन्येचा घात करणाऱ्या फितूरांचा आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा वध झाल्याशिवाय या वीरांना पुष्पांजली वाहिली जाऊ शकत नाही...

जय राणी लक्ष्मीबाई!
जय भारतमाता!

🙏🙏🙏

Saturday, November 1, 2025

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची अमर शौर्यगाथा ( कथामंजिरी ४-३-15) ( MadArt_369 Illustration)

 

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची अमर शौर्यगाथा ( कथामंजिरी ४-३-15) ( MadArt_369 Illustration)

निःशब्द आणि सुन्न करणारा अग्रलेख 🙏🙏🙏


राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू कधी होऊच शकत नाही...


ती आजही भारतमातेच्या हृदयात आहेच आहे 


आणि सदैव असणारच आहे.


🙏🙏🙏

राणी लक्ष्मीबाईला भावपूर्ण वंदन.

🙏🙏🙏