१९) शांभवी विद्या
तुलसीपत्र १३७४-१३७६
(इतर सद्विद्या बद्दल वाचण्यासाठी येथे क्लीक करा .)
शांभवी विद्या ही ह्या विश्वातील श्रीविद्येची
सर्वश्रेष्ठ देणगी आहे.
ही विद्या म्हणजे
ह्या विश्वातील कुठल्याही पदार्थांचे, ऊर्जास्त्रोताचे ,ऊर्जासमूहांचे,मानवी मनाचे,
श्रद्धावानांच्या बुद्धीचे खऱ्याखुऱ्या श्रद्धावानाच्या संपूर्ण जीवनाचे अगदी टोकाचे परिवर्तन घडवून आणणारी आदिमातेची सर्वात मोठी देणगी आहे.
शांभवी विद्या👉 ही कधीच खंडित होत नसते.ती भागाभागात शिकता येत नाही किंवा तुकड्यातुकड्याने थोडीथोडी ग्रहण
करता येत नाही.
ह्या विद्येच्या एकूण १८ कक्षा आहेत.ह्यातील १६ कक्षा शिवगणांना व ऋषिकुमारांना जाणवतात.
पण १७ वी व १८ वी कक्षा मात्र अनुक्रमे
त्रिविक्रमाच्याव महादुर्गेच्या कृपेनेच प्राप्त होते.
आणि ह्या दोन कक्षा प्राप्त करून घेणे हेच
मानवी जन्माचे सर्वोच्च ध्येय असते.
ह्या १८ कक्षा म्हणजे शांभवी विद्येच्या १८
पायऱ्या आहेत.
शांभवी विद्या व श्रीविद्या कधी एकरूप असतात, तर कधी वेगवेगळ्या; व त्याचे कारणही एकच,
श्रद्धावानांना त्या सोप्या व्हाव्यात म्हणून.
श्रीविद्येशिवाय शांभवी विद्या नाही व शांभवीविद्येशिवाय श्रीविद्याही नाही.
थोडक्यात शांभवी विद्या म्हणजे त्रिपुरासुराचा वध कसा होतो हे शिकवणारी विद्या.
आणि हा त्रिपुरासुर म्हणजे तारका सुरांचे तीन पुत्र म्हणजेच मानवाने केलेल्या कर्मस्वातंत्र्याच्या दुरुपयोगाचे तीन परिणाम.
विद्युन्माली म्हणजे भावापराध
कमलाक्ष म्हणजे प्रज्ञापराध
तारकाक्ष म्हणजे न्यायापराध.
ह्या तीन्हीं प्रकारच्या अपराधांचे एकत्रित
व्यक्तिमत्त्व म्हणजे त्रिपुरासुर.
जेव्हा मानवाला पूर्ण पश्चात्ताप होऊन तो आदिमातेस व त्रिविक्रमास मन:पूर्वक शरण
जातो,तेव्हाच त्रिशूळ धारण करणाऱ्या परमशिवाला आदिमाता त्या त्रिपुरासुराचा
वध करण्याची आज्ञा देते.
आणि ह्या त्रिपुरासुराचा वध कसा होतो ही विद्या म्हणजेच,
👇
🌷शांभवी विद्या🌷
आणि हे शिकवण्यासाठी अध्यापिका आहे
ब्रह्मवादिनी लोपामुद्रा .
कर्मस्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊच नये ह्या साठीचा एकमेव मार्ग म्हणजे कर्मस्वातंत्र्याचे स्तंभन करवून घेणे.
व कर्मस्वातंत्र्याचे स्तंभन करण्याचा अधिकार आदिमाता अनसूयेने माता शिवगंगागौरीकडे सोपविलेला आहे.
नितांत पश्चात्ताप होऊन शरण गेलेल्या
श्रद्धावानांसाठी, आदिमातेची क्षमा व त्रिविक्रमाचे अकारण कारुण्य दैवी पवित्र आधार तयार करीत राहते.ते दैवी पवित्र आधार वापरण्यास शिकण्याची कला अर्थात् मार्ग म्हणजेच,
🛎 शांभवी विद्या.🛎
ह्याची एकमेव गुरु केवळ ही आदिमाता
स्वतःच आहे.
आदिमातेची सर्जनशक्ती,नवनिर्मितीची शक्ती जेवढी बलवान,तेवढीच हिची तिने तयार केलेल्या कणापासून ब्रह्मांडापर्यंतच्या
प्रत्येक गोष्टीला सांभाळण्याची शक्तीही बलवान आणि तेवढीच ते सर्व नष्ट करण्याची शक्तीही बलवान;
आणि ही तिची तीनही प्रकारची क्रिया
म्हणजेच
👇
❤️ शांभवी विद्या.❤️
इदं अनिरुद्धस्य!
श्रीराम! अंबज्ञ!नाथसंविध्!
No comments:
Post a Comment