Friday 8 March 2024

महर्षि पवित्रानंद ( ऋषि कल्मषपाद) Pavitranand Family Tree

 

Pavitranand Family Tree


🌄 महर्षि पवित्रानंद Ref.kathamanjiri 3/92


ब्रह्मर्षि वसिष्ठ

⬇️

वंशज 

महर्षि पवित्रानंद.

( कल्मषपाद)


कल्मषपाद हे नाव ऋषिवर्यांनी मुद्दाम धारण केलेले आहे.


ह्या नावाने त्यांनी सर्व कुविद्या,तसेच सर्व तंत्रविद्या शिकून घेतल्या व  सनातन धर्मियांसाठी अनेक पवित्र गोष्टी तयार करुन ठेवल्या.


ते फक्त चातुर्मासात वसिष्ठ आश्रमात येऊन राहतात.बाकीचे आठही महिने ते सनातनधर्मियांचे

रक्षण करण्यासाठी अगदी सर्वत्र फिरत राहतात.


ह्यांची पत्नी महामति इरावती ही सुद्धा ह्यांच्याइतकीच सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण आहे.

ह्या दोघांनाही त्यांच्या धाडसी उपक्रमामध्ये स्वतः

गुरु वसिष्ठांनीच सहाय्य केले होते


हेच सरस्वतीदेवीचे पिता व माता आहेत.ह्यांना एकूण ११अपत्ये आहेत.


त्यातील चार म्हणजे

१) सरस्वतीदेवी

२) रामप्रसाद शर्मा

३) शिवप्रसाद शर्मा

४) शिवप्रियादेवी


ही सर्व अपत्ये ह्यांच्याकडे कमीतकमी  तीन सामर्थ्यांनी युक्त आहेत.ह्यांच्या ११ अपत्यांनी,

ऋषियान साम्राज्यासह भारतवर्षातील नऊही 

साम्रांज्र्यांशी निकटचे आप्त संबंध केलेले आहेत.

व ते सतत कार्य करतच असतात.


मेघनादाने स्थापन केलेल्या ' मेघपथ' ह्या स्थानावरच महर्षि पवित्रानंदांनी त्यांचा आश्रम सुरु केला होता व त्याबरोबर गुरु वसिष्ठांनी त्या आश्रमास आपलाच एक आश्रम म्हणून घोषित केले.


COMPILATION: Mohiniveera Kurhekar

No comments:

Post a Comment