Saturday 23 March 2024

# सिद्धयोगी #ज्ञानगंज

 # सिद्धयोगी Anand Rudra

* प्रौढ, उमदा, देखणा राजपुरूष 

* चिदानंदचे तंतोतंत प्रौढ स्वरूप

* प्रापंचिक - विवाहित

* युवराज आकाशकुक्षचा अत्यंत जवळचा आप्त. त्याची माता ही सिद्धयोगीची ही माताच आहे.

* मातेने कानात सांगितलेल्या मंत्र गजरावर विश्वास

* पित्याने शुभ्र धवल घोडा ' राजन ' ( अनेक गुण व कौशल्य असलेला)  १८ व्या जन्मदिनी भेट म्हणून दिला - अश्व एक विलक्षण कोडे. इतकी वर्षे लोटली तरी अश्वही तसाच व पिताहि.

* ब्रम्हर्षी गौतमांनी काहीही सांगण्यास नकार दिला, ब्रम्हर्षी याज्ञवल्क्यांनी मंत्रगजर करण्यास फक्त मन हलवून संमती दिली, अहल्येचि माता पूर्णाहुतिने तर कडक  शब्दात, भलते धाडस न करण्यास बजावले होते फक्त महर्षि शशिभूषणांनी विचारांना अनुमोदन व कार्यासाठी आशीर्वाद दिले.

* महर्षि शशिभूषण म्हणाले - मी तुझ्यामध्ये माझेच प्रतिबिंब पाहत आहे. तू ज्या मार्गावरून चालू इच्छित आहेस, तो मार्ग सोपा नाही. तू प्रभू रामचंद्रांच्या  वनवासगमन मार्गाने जा, तुझा खरा मार्ग सापडेल.

* मंथरेला - घृणातिशयेला शोधायला निघाला. (ती कधी कुबुद्धि, कधी कुविद्येच्या रुपात सर्वत्र वावरत असते, कुणाचाही घात करण्याचे सामर्थ्य तिच्याकडे आहे.)

*  कुविद्या शिकण्याची व त्या सर्व कुविद्यांच्या विरुद्ध असणाऱ्या सिद्धी, शक्ती व अस्त्रे ह्यांचा अभ्यास करण्याची तळमळ.

* सिद्धयोगीकडे मातृप्रेम + पितृभक्ती होती आणि ह्यामुळेच ज्ञानगंजमध्ये प्रवेश मिळाला.

* पिता हा जीवनाचा अधिनायक ( hero) होता, आहे आणि राहील. मातेपेक्षा पिता अधिक प्रिय.

* पित्याचे व मातेचे कार्य व नाव यशस्वीपणे चालवण्यासाठी अफाट प्रयत्न.

* पित्यापासून काहीही लपवले नाही मात्र मातेपासून अर्ध्या गोष्टी लपविण्यास माता अहल्येनेच सहाय्य केले.

* माता कैकयीने एक थैली दिली. त्यात रामनामाची मुद्रिका + चिठ्ठी होती. ( ही रामनामाची मुद्रिका भगिनी सुमित्रेने माता कैकयीला दिली होती).

* ज्ञानगंज मध्ये प्रत्येकाने स्वागत केले - असंख्य ब्रम्हर्षी, सिद्ध, भक्त, परमभक्त, सिद्धयोगी, प्रेमयोगी.

* सिद्धयोगीने ज्ञानगंज मध्ये ९ वेळा प्रवास केला.

* प्रत्येक प्रवासात ९ पायऱ्या चढत राहिला. प्रत्येक पायरीवर एक सिद्धयोगी - काहीतरी शिकवीत होता.

* १ल्या खेपस ९ व्या पायरीवर असलेल्या सिद्धयोगीने एक मंत्र दिला व त्याच्या कूटीत नेऊन खूप काही शिकवले.

* 3ऱ्या ज्ञानगंज भेटी नंतर माता कैकयी व लक्ष्मण माता सुमित्रा, ब्रम्हर्षी वासिष्ठांकडे घेऊन गेल्या - वसिष्ठआश्रमात ( महर्षि पवित्रानंद यांचा आश्रम मेघपथ स्थानावरील - मेघनादशक्तीने लक्ष्मणास मूर्च्छित केलेले स्थान). महर्षि पवित्रानंदांनी विधिवत शिष्य करून घेतले, लक्ष्मणविद्या शिकवण्यासाठी. कार्य संपन्न होताच ही विद्या महर्षि पवित्रानंदांकडे परत जाईल.

* दरवर्षीच्या चातुर्मासात महर्षि पवित्रानंद, ७ वर्षे जिथे कुठे सिद्ध योगी असेल तिथे येऊन शिकवू लागले. नंतर दर वर्षी भेटणे होत राहिले. दरवर्षीच्या आषाढ पौर्णिमेला सिद्धयोगी महर्षि पवित्रानंदांना त्यांच्या आश्रमात भेटत आहे.

* एका आषाढयात्रेच्या वेळेस पत्नीवर व तिच्या बंधूवर जीवघेणा हल्ला झाला. ते थोडे बरे झाल्यावरच सिद्धयोगिने परत यात्रा सुरू केली.

* दुसऱ्या यात्रेच्या वेळेस, रथीसम्राज्ञी नर्मदादेवींची कन्या व पुत्र तसेच रथीसम्राट हृषिकेशनाथांची एकमेव प्रिय भगिनी अन्नपूर्णा देवी अकस्मात नाहीसे झाले होते.

* पित्याने व ब्रह्मवादिनी अहल्येने कायम एकच सांगितले की अन्नपूर्णेचा निरोप तिच्या मुद्रेसह आला की तो पाळायचाच.

* अन्नपूर्णाच सिद्धयोगीच्या लक्ष्मणविद्येच्या वापरावर नियंत्रण ठेवू शकते.

* ८ व्या खेपेस ७२ व्या पायरीवर उभा असलेल्या सिद्धयोगीने मंत्रोपदेश, विद्योपदेश, तंत्रोपदेश, योगोपदेश आणि यज्ञोपदेश केला.

* ९ व्या खेपेस, ८१ व्या पायरीवर उभा असलेला सिद्धयोगी हा शिवाचा डमरू - शिवपुत्र - शिवदास - शिवसखा आहे.

* रामनामाचा स्पर्श हीच जिवंतपणाची एकमेव जाणीव

* शेवटच्या पायरी नंतर महाराज वासुकी व प्रत्यक्ष भगवान शिव दर्शन.

* अनेक ज्ञानगंजसिद्धी प्राप्त.

* धर्मलेखा ही विजयरुद्रांना  सुद्धा अनेक गोष्टी कळू देत नाही परंतु त्या गोष्टी सिद्धयोगीला ठाऊक असतात. धर्मलेखेला सगळ्यांपेक्षा जास्त ओळखतो, ते केवळ लक्ष्मण विद्येमुळे.

* स्वयंपूर्णादेवी व अन्नपूर्णादेवी यांना नीट ओळखतो. गेली १४ वर्षे ह्या दोघी सिद्ध्योगीला वारंवार भेटत असतात. त्यांच्या सारखीच असणारी तिसरी सदैव त्याच्या बरोबरच असते.

* बद्रीनाथ क्षेत्रामधील धर्मस्थानावर ठेवलेल्या केशवादित्य व अन्वयेचा संरक्षक

* पाण्यातही श्वास घेऊ शकतो.

* अन्नपूर्णेचा सिद्धयोगीवर असीम विश्वास आहे व आशीर्वादही


# सिद्धयोगी

* अवघ्या 2 शस्त्रांनी झाखिणी ( दनुकन्या / प्रतीदनु) व दनुला पळवून लावले. 

* ब्रम्हर्षी वसिष्ठ यांच्या आज्ञेशिवाय सिद्धध्यान लावत नाही.

* चरंग ग्रामातील काश रायच्या ( आकाशकुक्ष) प्रसदमध्ये : 

      √ धर्म लेखेचा हात तिच्याही नकळत सिद्धयोगी साठी आशीर्वादासाठी उंचावला.

      √ सिद्धयोगी व विजयादेवींनी मिळून धर्मलेखेस हातावर उचलून वरच्या मजल्यावर नेले

      √ सिद्धयोगीचा भाला सर्कीच्या ( Sathadorina - शतकालकुटा छातीत रुतुन बसला, भीषण किंचाळी ठोकत ती पळून गेली.

      √ पित्याचा प्रमुख आदेश - पाहिले ते सावधपण

      √ सिद्धयोगीलाजवळ घेत धर्मलेखा म्हणते - तू कधीच चूक केलेली नाहीस आणि आजही नाही.

* ' रणधीर रूद्र विजय ' ग्रंथ वाचला आहे.


COMPILATION  - Jayashriveera Panchbhai


🌸कथामंजिरी ३/९१🌸

ज्ञानगंज ( सिद्ध भूमी)

सनातन पवित्र धर्म आणि अपवित्र निशाचर तंज्ञमार्ग.हे एकाच चुंबकाच्या दोन ध्रुवांप्रमाणे
(Poles) आहेत.
व हयाचे शिक्षण व उपदेश  ज्ञानगंजमध्ये
व्यवस्थित शिकल्यावरच त्या दोन ध्रुवांच्या बरोबर मध्यावर असणारा एक वेगळाच महामार्ग प्राप्त होतो.

३/१०९

🌑अज्ञान गंज -अंध:कारगंज (दुर्गतिभूमी)🌑

ह्या विश्वात जसे ज्ञानगंज आहे तसे अज्ञानगंजही आहे.
कंटकेच्या कानात अज्ञानगंजच सांगत होता
- होय! ही खरीखुरी धर्मलेखा आहे.

🍂३/११५-११६ कथा मंजिरी


ज्ञानगंजाच्या स्वामीस, हैय्यवाॅनस ग्रंथात,

सुरथाने भावपिता म्हणून संबोधिलेले आहे.व

ह्या ज्ञानगंजस्वामींची कन्या भाव कन्या आहे.

ह्या ज्ञानगंजस्वामींची निवड स्वतः त्रिविक्रमाने केली

आहे.

🖕

ह्या ज्ञानगंजस्वामींसाठी प्रकाश व

अंध:कार हा भेदच नाही.ते अंध:काराचे रुपांतर

प्रकाशात करु शकतात आणि त्यांना आवश्यक वाटल्यास प्रकाश रोखून ठेवू शकतात.हे कुविद्या व निशाचर विद्या वापरुनही पवित्रच राहतात  व ते फक्त

त्रिविक्रमाचीच गोष्ट ऐकतात.


हे ज्ञानगंजस्वामी  अज्ञानगंजच्या सत्ताधीशास 

शत्रू म्हणत आहेत.

👆

हा शत्रु....

पुरुषनावाने  ( 'युद्धपिता, द्वेष पिता')

व स्त्री नावाने मत्सरा.म्हणून हैय्यवाॅनस ग्रंथाद्वारे 

ओळखला जातो.


आपण आता हे लक्षात घेऊन की,

त्याच ग्रंथात ज्या अज्ञानगंज सत्ताधीशाला

राजा सुरथाने 'अभावपिता'

ह्या नावाने संबोधिलेले आहे.त्याची कन्या

अभावकन्या आहे.


व ज्ञानगंजस्वामी व ह्या अज्ञानगंजच्या सत्ताधीशाने

मिळून तयार केलेल्या कन्येचे नाव मृगजला

व अपूर्णा आहे.


आता  ज्ञानगंजस्वामींची भावकन्या व वरील

अभावकन्या

दोन्हीही रुपे धर्मलेखेचीच आहेत.असे धर्मलेखा विजयरुद्रांना सांगत आहे.म्हणून ती म्हणते,

मी दोघांचीही कन्या आहे.


ह्यातील भाव कन्या

विजयरुद्रांची धर्मलेखा पूर्णा आहे.


व अभावकन्या सुद्धा धर्मलेखा आहे.पण हिचे बीज

अभावाची भावना ईश्वराकडे नेते.


व दुसरी अपूर्णा म्हणजे दोघांनी तयार केलेली मृगजला भ्रामक आहे. जी अभावाची भावना मानवाला अशुभ मार्गावर नेते.तिचे बीज कंटकेमध्ये आहे जी

प्रतिधर्मलेखा आहे.व तीच अपूर्णा - मृगजला ( भ्रामक)आहे.


विजयरुद्रांचे चुकुनही दुरुनही अभावाशी 

नाते नाही;कारण ते शुद्ध सख्यभक्तिभाव आहेत.

म्हणून त्यांचे नाते ज्ञानगंजस्वामींच्या कन्येशी 

भाव कन्येशी आहे.कारण प्रेमभक्ती अर्थात् सख्यभक्ती व दास्य भक्ती एकत्र आल्यावर अशुभ मार्ग उरतच नाही.म्हणून विजयरुद्र फक्त एक ज्ञानगंजस्वामींचे जामात आहेत.


धर्मलेखा म्हणते मी अभावपूर्णासुद्धा आहे.

(अपूर्णा नव्हे.)


कारण १) जेव्हा मानवाला अभावाची जाणीव होते,

तेव्हाच तो शोध घेऊ लागतो.ज्याचा शोध पवित्र मार्गाने चालतो,तो ईश्वराला पूर्णभाव व स्वतःला

अंशभाव मानून दास्यभक्तीकडे वळतो.


आणि जेव्हा, २)  मानव शोध घेण्यासाठी अपवित्र मार्गाचा अवलंब करतो,असत्याचा अवलंब करतो,

अर्थात् दुष्ट बुद्धी वापरतो,तेव्हा तो निशाचर मार्गाकडे  वळतो.व कायम मृगजळामागेच

धावत राहतो.व अपूर्णच राहतो.


ह्यामुळे अभावाची  भावना चांगलीही आहे आणि

वाईटही आहे.


जी अभावाची भावना ईश्वराकडे नेते तिचे बीज धर्मलेखेत आहे.अभावपूर्णात आहे.


व जी अभावाची भावना  मानवाला अशुभ मार्गावर

नेते,तिचे बीज कंटकेमध्ये अर्थात्

अपूर्णामध्ये आहे.

Aniruddha's Agralekh Discussion Group on telegram Notes 


तो ज्ञानगंज स्वामी त्या सिद्धभूमीच्या बरोबर मधोमध असणाऱ्या एका विशाल वटवृक्षाखाली राहतो . तो वटवृक्ष प्रलयात देखील लय पावत नाही . ह्या वटवृक्षाच्या एका पानावरच म्हणे , ह्या पवित्रमार्गीयांचा देव प्रलयजलावर तरंगत राहतो . ❤️ कथामंजिरी ३/११६



1 comment:

  1. हरि ॐ, सिद्धयोगी विषयीची संकलित केलेली माहिती खुप छान ! 👌 अंबज्ञ

    ReplyDelete