Tuesday 5 March 2024

How reading Katha Manjiri and Agralekh are beneficial for us.

 हरिः ॐ

1.  कथामंजिरी  १/२/३..base हा वैश्विक ईतिहासाशी निगडित आहे.

कथामंजिरी २ ही गुरुनाम, गुरूपादुका,'मंत्रगजर' महात्म्य यांनी ओतप्रोत भरलेले आहे ..

कथामंजिरी ३ ही परत गोष्टीरुप असून, वैश्विक ईतिहासाला जोडलेली आहे..

2.  कोणताही अग्रलेख हा आपल्याला दिवसभर positive vibrations देत रहातो.

बापुंबरोबर संवाद साधत रहातो....जे बापुला अपेक्षित असते....( भक्तीभाव चैतन्य संवादात जे आपण ऐकतो.....'त्याच्याशी बोलत रहा'..'आपले बोलणे त्याला आवडत असते'...)

3.  'आपल्याला फायदा हा कशापध्दतीने होऊ शकेल'?...हा बापूचा मार्ग ! 'माझे बाबा त्यांचा अमूल्य वेळ खर्च करुन हे लिहीतोय ना आपल्यासाठी मग ते वाचायचच...जो भाग समजेल ती बापूची ईच्छा आणि जो भाग नाही समजू शकणार त्यावर विचार करायला लावणे हीपण बापुचीच ईच्छा....

4.  तुलसीपत्र 1640 मध्ये - देवर्षी नारदांनी आणि कांचनवर्मा यांनी कथामंजिरी बद्दल उत्कृष्टरित्या समजून सांगितले आहे.

5.  या व्यतिरिक्त, कथामंजिरी द्वारे मी काय अनुभवत आहे, सक्रिय ऑनलाइन उपस्थिती (सहभागी) होऊन , सखोल विचार आणि या चर्चांद्वारे विविध दृष्टिकोन स्वीकारणे, नोट्स बनवण्याचे महत्त्व इ. कळून येते

6.  कथामंजिरी सोबत राहणे म्हणजे एक आनंद देणारी उपासनाच आहे. बापूंच्या सोबत राहण्याची एक उचित संधी आहे. मज्जाच मज्जा. लहान मुलांना कशी आज्जी गोष्ट सांगते व मुले कान देऊन व उत्सुकतेने कथा ऐकतात. एन्जॉय करतात. तसेच आपण बापू सांगतील ती कथा उत्सुकतेने ऐकतो व एन्जॉय करतो.

7.  अग्रलेख एक असून सुद्धा - जितके श्रद्धावान कथा मंजिरी वाचत आहेत ना तितके भाव दृष्टीकोण पॉईंट बापू तयार करून घेतात  (प्रत्येकाच्या हृदयात, बुद्धीत, मनात, चित्तात व त्याच्या जगात ) 

8.  अग्रलेख वाचणे म्हणजे बापूंचे शब्द ऐकणे. बापू सोबत बोलण अग्रलेखाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो . खूप सुंदर लेख आहेत. त्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. बुद्धीला चालना मिळते. असे वाटते प्रत्येक अग्रलेख समीर दादां बरोबर बसुन समजून घ्यावे. पुन्हा नव्याने ह्या गोड शाळेत प्रवेश घ्यावा. काय गोड गुरूची  शाळा

9.  कथामंजिरी, वरुन समजते की आपल जीवन फार इज़ी आहे. त्या सर्वानी किती त्याग, त्रास आणी बरेच काही सहन केले. आपल्याला थोडे तरी त्यांच्या कडून शिकता आले पाहीजे.

•  मंत्र्गजर..भक्ती.

•  विश्वास.

•  धर्मलेखा व विजयरुद्रंचे प्रेम.

•  केशवदीतयचा विश्वास..

•  आंनदरूद्र ची नित्य उपासना.

•  आणी बरेच काही.

•  विविध मंत्राची ताकद.

•  त्रिविक्रमा वरिल खुप खुप प्रेम,भक्ती,विश्वास आणी सर्वस्व.

10.  यासोबत कथामंजिरी बद्दल म्हणाल तर, बापूची कोणतीही गोष्ट ही 'फायदा- तोट्याच्या' पार पलिकडे असते....त्याच्या बाळांच्या  विकासासाठी असते...जी त्याच्या कळकळीतून आणि तळमळीतून दिसून येते...'अकारण कारुण्य आणि लाभेविण प्रेम'. जे 'श्रीसाईसत्चरित्रातही'  ठायी ठायी दिसत. (सद्गुरुतत्त्वाच्या 'लीला' समजणे अत्यंत कठीण.)

11.  कथामंजिरी का वाचायची म्हणजे आईच दूध का प्यायच विचारण्या सारख आहे. आईच्या दूध.. शरीराला कसे पोषक असत. त्याने काय काय फायदा होतो. हे विचारत बसत का बाळ.? दूधातले ingredients त्या मागील science माहीत असत का?..की माहीत करुन घेईन मगच पिईन ..अस म्हणत का बाळ.?....नाही ...तसेच आम्हा श्रद्धावानचे,  बापू रुपी आई कथामंजिरीद्वारे (दुधाद्वारे) श्रद्धावानस काय काय देते हे अनुभवने महत्वाचं .. कधी एकदा तर .. अशी स्थिती होते ..अरे आज पेपरवाल्याने प्रत्यक्ष टाकला नाही .. आणि नेमका "मंगलवार" .. अरे यार ! Pls फक्त अग्रलेख मिस झालाय ही रुखरुख राहते, तरी यावर ही उपाय करून दिला बापूनि हिंदी अग्रलेख देऊन !!... अशी आमच्या सारखी,  अगदी तशीच स्थिती अग्रलेख वाचणार् या आम्हा प्रत्येकाची होत असते. सरतेशेवटी कथामंजिरी म्हणजे वाघिणीचे दूधच, म्हणून आम्ही श्रद्धावान कथामंजिरी वाचतो.


तू धेनू मी वासरु

तू माय मी लेकरु

पाजी  "कथामंजिरी" प्रेम पान्हू अनिरुद्धे ...


हरी ओम | श्रीराम | अंबज्ञ | नाथसंविध्


Discussion : Agralekh Discussion group Shraddhawan 

Compilation : Harshaveera Chavan

No comments:

Post a Comment