Tuesday 9 January 2024

Garud Jamat as per Tulsipatra 1069

गरुड जमात 

katha manjiri 3-77
तुलसीपत्र १०६९ 


गरुड जमात -अत्यंत प्राचीन वसाहत


ही जमात निरनिराळ्या पर्वतांच्या शिखरावरच वस्ती करुन राहत असे.

ह्यामुळेच त्यांना इतर सर्व लोक ' गरुड जमात'

असे म्हणत असत.आणि ह्या जमातीलासुद्धा

हे नाव अभिमानास्पद वाटत असे.


हे ॲक्विला ( Aquila-Eagle-गरुड) जन 

अत्यंत सुसंस्कृत, सुशिक्षित व सदाचारी होते.


ह्यांची धार्मिक मुल्ये हे लोक अत्यंत कर्मठपणे

जपत असत.व त्यामुळे ते इतर जमातीत मिसळत नसत.अगदी शर्मण्य( जर्मनी) ग्रीस, इस्तंबूल,ॲंतोलिया,गॅरोआरिकी ( रशिया)

टार्टारस (तुर्कस्थान) एवढेच नव्हे तर भारतवर्षामध्येसुद्धा ह्या गरुड जमातीच्या

वसाहती होत्या.


हे सर्व देशांतील गरुड जन एक मूळ माता व तिचा एक पुत्र आणि त्या पुत्राने श्रद्धावानांच्या हितासाठी

व आरोग्य रक्षणासाठी तसेच, निसर्गाचे सौंदर्य 

जपण्यासाठी खास तपश्चर्येने तयार केलेली दिव्य शक्ती ह्यांचे पूजन‌ करत असत.


निरनिराळ्या ठिकाणचे गरुडजन त्या मूळ मातेस

'मॅग्ना मात्तेर ' 'मॅगाॅस मात' ''माॅना मत्तार' किंवा 'महामाता' अशा विविध नावांनी वेगवेगळ्या प्रदेशात

संबोधत असत व तिच्या पुत्रास ग्रीसमधील गरुड लोक ट्राय-इष्कमस (Tri-Ichkumus)ह्या नावाने ; 

व त्या दिव्य आरोग्यवर्धिनी शक्तीही ॲफरा व 

अरुला ह्या नावांनी पूजत असत.


sankalan - Mohiniveera Kurhekar

No comments:

Post a Comment