Wednesday 31 January 2024

अलकनंदादेवी

 ३/८७ अलकनंदादेवी


अहल्या➡️ कन्या अपराजिता➡️ कन्या अलकनंदादेवी

अलकनंदादेवी

त्यांच्याकडे  मातामही अहल्येने अनेक सिद्धी
दिलेल्या आहेत.

त्या सम्राट मकरसिंहांच्या पत्नी आहेत.
त्यांना २४ वर्षांचा वृषभसिंह नावाचा एक पुत्र आहे.

त्यांनी तीन वर्षे खपून
५२ वर्षांपूर्वीच्या घटना लिहून पूर्ण केल्या होत्या.
पण तरीही त्यांचे कार्य पूर्ण झालेले नव्हते.

यक्षेश्वरीच्या गाभाऱ्यात वेळोवेळी येऊन
त्यांना सम्राट ब्रह्मानंदरुद्रांच्या आज्ञेनुसार पुढील काळातील काही गोष्टी लिहून ठेवायच्या होत्या.

पहिल्या लेखनानंतर पुढची दहा वर्षे त्या ह्याच मंदिरात राहत होत्या.आणि तेसुद्धा पतंजलियोगाचे
कठोर नियम पाळूनच.ज्याचे 'ब्रह्मचर्य' हे अविभाज्य अंग होते आणि म्हणूनच ६४ वर्षांच्या
अलकनंदादेवींचा पुत्र वृषभसिंह सध्या फक्त २४
वर्षांचा होता.

No comments:

Post a Comment