Monday, 30 December 2024
Friday, 27 December 2024
पिपासा अभंगातील ओळी 'रुसुन बसला बापू माझा कोणा कोपऱ्यात' नुसार चित्र रेखाटण्याचा बापूंच्या कृपेने केलेला प्रयास
(Creativity by - बिपीनसिंह अमृतकर)
Tuesday, 24 December 2024
Sunday, 22 December 2024
व्रतपुष्प संख्या कैसे याद रखें ?
How to remember the number of Vratpushpa we need to chant on specific day of Shree Vardhaman Vratadhiraj , suggested by our dearest Dad Sadguru Aniruddha Bapu in Shreemadpurusharth Grantgraj Khand 3 Anandsadhana ? Here is simple trick for year 2024 -2025 Vratadhiraj . Just for you.
माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे. (Illustration : Sudeepsinh Kulkarni)
Friday, 20 December 2024
स्वयंभगवानाच्या कृपेशिवाय माणूस अपूर्ण आहे ( Discussion Notes )
🌻कथा मंजिरी ४/१/२४
भगवंताची कृपा म्हणजे काय?
सत्यप्रवेश चरण २७ मध्ये बापूंनी हे सविस्तर सांगितलेले आहे.
त्यावरून माझ्या अल्पबुद्धीला जे बापू कृपेने आकळले ते असे आहे.
👇
त्याच्या सहाय्याशिवाय म्हणजेच त्याच्या
कृपेशिवाय माणूस अपूर्ण आहे.
माणसाचे बळही अपूर्ण आहे आणि यश ही अपूर्ण आहे.
माणूस अपूर्ण आहे, हे आपण अनुभवू शकतो.
अगदी प्रत्येक सत्कर्म करताना त्याच्या अधिष्ठानाने केलेले कर्म व त्याला न स्मरता केलेले कर्म ह्यांच्या
यशात किती तफावत असते ते आपण रोजच्या दैनंदिन जीवनातसुद्धा अनुभवत असतो.परीक्षा देत असताना तर जास्तच अनुभव घेतलेला असतो.
त्याचे साहाय्य मिळणारच हा आधार
व तो माझा उद्धार करण्यास समर्थ आहेच हा आत्मविश्वास.हे दोन्ही त्या भक्ताकडे असणे म्हणजे
त्या भक्तावर त्याची कृपा असणे.
कारण भक्ताला त्याचा वाटणारा आधार व भक्ताचा आत्मविश्वास त्या स्वयंभगवानानेच दृढ केलेले असतात. स्वयंभगवानाची कृपा असल्यावरच त्या भक्ताला ह्या गोष्टी आकळतात.
पण ती कृपा त्या भक्ताला प्राप्त होण्यासाठी त्या भक्ताने उचित श्रम करून कर्म करत असताना
प्रेमाने त्या देवाधिदेवाला, त्या स्वयंभगवानाला ,
त्या पूर्णाला आठवले पाहिजे.व त्याच्या त्या क्रियेला समग्रत्व म्हणजे पूर्णत्व मिळावे अशी
त्याला प्रार्थना केली की त्या भक्ताला आधार म्हणजे साहाय्य मिळतेच व त्याचा स्वयंभगवानावरचा विश्वासही दृढ झालेला असतो त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढलेला असतो.
त्याला आठवणे म्हणजे ते नामस्मरण असेल,भजन असेल,मन:पूर्वक पूजन असेल, गजर असेल .जे भक्ताला आवडेल ते पण त्यात प्रेमळ भाव पाहिजे.त्याची स्मृती ठेवणे म्हणजेच त्याला आठवणे .
हे त्याला प्रेमभावाने आठवणे, आपली गरज झाली पाहिजे. जशी लक्ष्मणरावांना झाली.
म्हणून लक्ष्मणराव म्हणाले, आपण सगळेजण देवघरात बसून शांतपणे गजर करु या.
श्रद्धावानांना म्हणजे आपल्याला आपल्या देवाधिदेवाने बापूरायाने,एक शाश्वत ग्वाही दिलेली आहे व तो पुन्हा पुन्हा सांगत असतो,
मी तुला कधीच टाकणार नाही.
हाच श्रद्धावानांचा सर्वात मोठा आधार आहे असे मला वाटते.
व माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे.
तो सर्वसमर्थ आहे. हाच फक्त मला माझ्या पापांपासून मुक्ती देऊ शकतो, हा आत्मविश्वासही श्रद्धावानांकडे असतो.कारण त्याला वेळोवेळी मिळालेल्या त्यांच्या साहाय्यामुळे, त्याला मिळालेल्या अनुभवामुळे त्यांच्या विश्वासाचे रुपांतर आत्मविश्वासात झालेले असते.व त्यासाठीच कृपासिंधू मासिक वाचायचे असते.त्याने इतर श्रद्धावानांना दिलेले अनुभव वाचल्यावर आपल्यालाही हे साहाय्य मिळू शकते हा भाव हा विश्वास वाढायला लागतो.व त्याच्या संकटाच्या वेळी तसेच साहाय्य त्याला मिळाल्यावर त्या विश्वासाचे रूपांतर आत्मविश्वासात झालेले असते.
म्हणजेच श्रद्धावानांकडे त्याची कृपा आहेच.
बापूंचा आधार व बापूंनी वाढवलेला आत्मविश्वास हीच श्रद्धावानावर त्याने केलेली कृपा आहे.
माझा भगवंत पूर्ण आहे म्हणूनच तो आधार देऊ शकतो व माझ्यात जे कमी आहे ते देण्यास तो एकमेव समर्थ आहे हा श्रद्धावानांचा भाव असतो.
म्हणून ते जीवनात सफल होतात व त्यांचा बापू राया त्यांच्या जीवनाचा विकास घडवत असतो.
श्रद्धावानाने त्याला एकच सांगायचे आहे की
देवाधिदेवा बापूराया,
तू माझ्या जीवनात माझा उद्धार करण्यासाठी जे काही ठरवले आहे तसंच घडव .
त्याच्या आड मी जरी आलो तरी मला बाजूला सारून तुला हवं तसं तू मला घडव.
पूर्ण असलेल्या स्वयंभगवानाच्या कृपेशिवाय
त्याची प्रत्येक क्रिया त्याचे बळ व त्यांचे यश अपूर्णच असते.
म्हणजेच मानवाने त्याचे प्रत्येक कर्म पूर्ण असलेल्या स्वयंभगवानाच्या अधिष्ठानानेच केलं पाहिजे तरच ते यशस्वी होते.जसे काशीनाथराव व गोजीबाईंचे कुटुंब करतात.
सत्यप्रवेश पान १८२ -१८३ मध्ये बापू सांगतात की,
👇
मानवी मनाने स्वतःच्या कर्मस्वातंत्र्याने उत्पन्न केलेली दारूण महाशक्ती म्हणजेच माया.
परमेश्वरी स्मृतीचा अभाव म्हणजे माया.
माया हीच स्वतः 'अ-भावातून' उत्पन्न होत असल्यामुळे ती माझ्या जीवनात फक्त अभावच उत्पन्न करू शकते.आम्ही मानव मात्र ह्या अभावजन्य मायेच्या सहाय्याने पूर्णता उत्पन्न करु पाहतो.
..... ही एकमेव गोष्ट अशक्यच नाही कां?
अभावातून पूर्णता कधी येते कां?
ह्याचाच अर्थ आमच्या जीवनात पूर्णता आणण्यासाठी आम्हाला त्या अस्तित्व असणाऱ्या,म्हणजेच भाव रुपाने असणाऱ्या परमेश्वराच्या स्मृतीचीच (श्रद्धेची) आवश्यकता आहे.
#######################
श्रीसाईसच्चरित
सदैव संपूर्ण साई हा । ५०/२१
म्हणूनच संपूर्ण असलेल्या परमात्मा बापूंना आठवून सर्व कर्मे केली की त्याचा आधार अनुभवता येतो व आपल्या विश्वासाचे रूपांतर आत्मविश्वासात होते म्हणजेच आपला परमात्मा बापू वरचा विश्वास परमात्मा बापूच दृढ करतो.
त्याला आठवणे, त्याची स्मृती ठेवणे, म्हणजेच उठाउठी मंत्रगजर करणे व ही देणगीही त्यानेच आपल्या बाळांना, श्रद्धावानांना दिलेली आहे.
Notes from
Aniruddha's Agralekh Discussion Group (Telegram)
Thursday, 19 December 2024
Naathsanvidh Explanation Infographics
Wednesday, 9 October 2024
श्री महिषासूरमर्दिनीचे आख्यान: काव्य
श्री महिषासूरमर्दिनीचे आख्यान : काव्य
ऐका ऐका जन हो सारेकथा तुम्ही आदिमातेचीभक्तांना प्रिय असे सर्वदाकहाणी श्री महालक्ष्मीची॥१॥
ऐका ऐका जन हो सारे
अशुभाचा जी नाश करी तीअशुभनाशिनी तिज म्हणतीमहिषासूरवध केला म्हणुनीमहिषासूरमर्दिनी म्हणती॥२॥
आरंभ कथेचा करूया आपणऋषी कश्यपां पासूनीप्रतिरूप ब्रम्हर्षी मरिचीचे हेचि घेऊया जाणोनी॥३॥
भार्या दोन तयाच्या नामेअदितीमति अन् दिती असतीश्रध्दावान अदितीमति तरदिती असे सौंदर्यवती॥४॥
दिव्य तपोबल आदितीमतिचेईश्वरभक्ती तिच्या मनीगुरूकुल आणिक पतिसेवेतूनजन्म घेतला देवांनी॥५॥
सात्विक तेज, पाहुनी सवतीचेदिती पेटली द्वेषानीक्रोध तिचा अन् मत्सर मिळूनीजन्म घेतला दैत्यांनी॥६॥
दितीपुत्र हिरण्यकष्यपुत्यास विकल्पाने वरिलाकामुकता अन् भोग मिळोनीअनुह्राद दैत्य जन्मा आला॥७॥
दैत्येश्वर अन् विश्वनियंत्रकवाटे व्हावे दैत्यालायाच राक्षसी इच्छेपोटीमहिषी आली जन्माला॥८॥
उन्मत्त होऊनी उन्मादानेमहिषीशी तो रत झालाअनुचित अन् अपवित्र रतीतूनमहिषासूर जन्मा आला॥९॥
जनक असे अशुभाचा आणिकढोंग आणखी कपटाचादुर्गुण पाहुनी हर्ष वाढलादिती विकल्पा दोघींचा॥१०॥
मरिचींच्या यज्ञस्थळी जाऊनीकपटाने वर मागितलास्वकेश अर्पूनी यज्ञामध्येअजिंक्य महिषासूर केला॥११॥
पराभूत इंद्रासह केले त्या दैत्पाने देवांनाजिंकुनिया अवघ्या पृथ्वीलागुलाम केले राजांना॥१२॥
देव धावूनी भर्गलोकी मगपरमात्म्यासी शरण आलेतारकमंत्राचा जप करण्यादेवांसी हरिहर वदले॥१३॥
वृध्दिंगत होता जप सारेअष्टभाव जागृत झालेअंकुर-ऐश्वर्य प्रवाहित होऊनीभर्गरुपाने अवतरले॥१४॥
आदिमातेचे तेज मिसळूनीमहातेज अतिदिव्य असेत्या तेजातून प्रकट होई जीअभूतपूर्व आकृती दिसे॥१५॥
तिच असे जी ब्रम्हविलासिनीमहात्रिपुरांबा तिज म्हणतीअखिल विश्व तिज म्हणे ईश्वरीहरिहर तिज आई म्हणती॥१६॥
त्या महालक्ष्मी रूपासी पाहुनीसृष्टी आनंदुनी गेलीदेवांनी तिज प्रतिक रूपांनीदिव्य आयुधे अर्पिली॥१७॥॥
अष्टादश आयुधे पाहुनीहरिहर आनंदित झालादेवीसिंहस्वरुप होऊनीॐ नमश्चन्डिकायै गर्जला॥१८॥
सिंहारुढ महालक्ष्मी मातापृथ्वीतलावरी अवतरलीआश्रमात ती कर्दम ऋषींच्यापवित्र स्थानी स्थिरावली॥१९॥
अतिपावन कतराज आश्रमीपाऊल प्रथम तिचे पडलेम्हणोनीच मग कात्यायनी हेनाम तिचे पारचलित झाले॥२०॥
आरंभ करोनी घंटानादामोहित केले असूरांनाकरोनिया क्षीण बळ अशुभाचेभयभीत केले दैत्यांना॥२१॥
महिषासूर भानावर आलाआज्ञा केली सैन्यासीसेनापती आले ते करण्यापराभूत आदिमातेसी॥२२॥
दुर्वृत्तींचे आगर असतीकपट तयांच्या ठायी वसेप्रमुख असे असिलोमा त्यांचाफितुरी ज्याचा प्राण असे॥२३॥
अष्टादश आयुधे रोखुनीप्रहार मातेने केलेसेनापतींसी वधुनी त्यांनायमसदनासी पाठविले॥२४॥
असिलोमा निःशस्त्र बनोनीमातेवर धावूनी आलाप्राशुनी त्याच्या रक्ता तत्क्षणीदेवीसिंह मोदे गर्जला॥२५॥
महिषासूर युध्दात उतरलानाश कराया मातेचाविविध रूपे मायावी घेईकरी वापर तो कपटाचा॥२६॥
महिष बनोनी महिषासूर तोमातेवरी धावुनी गेलामातेने बनवुनी ʼअग्नीकंकणा ʼबंदी त्यामाजी केला॥२७॥
वेगाने उड्डाण करोनीकंठकुपावरी पाय दिलात्रिशुल रोखुनी ह्रदयावरतीदेह छिन्नविछिन्न केला॥२८॥
रक्षी शुभ अन् संपवी अशुभाअद्भभुत कंकण गौरविलेʼमणीभद्र ' असे त्या नाम देऊनीधारण मातेने केले॥२९॥
सुरवर आणिक ऋषीमहर्षीगर्जु लागले हर्षानेजयजयकार करूनी मातेचाउधळू लागले स्तुतीसुमने ॥३०॥
प्रसन्न होऊनी आदिशक्तीनेत्यांसी दोन वरां दिधलेशरण येऊनी हाक मारितासत्वर येईन वचन दिले ॥३१॥
जो कुणी गाईल तिचे स्तोत्र अन्प्रेमाने आख्यान तिचेनाश करील ती दुःखांचा अन्वृध्दिंगत वैभव त्याचे ॥३२॥
हे आई वात्सल्यचण्डिकेहेचि मागणे मी मागेजन्मोजन्मी मी गर्जावेजय जगदंब जय दुर्गे !!जय जगदंब जय दुर्गे!!॥३३॥
- डाॅ. प्रिया कर्णिक.
॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ ॥नाथसंविध॥
श्री अशुभनाशिनी नवरात्राच्या निमित्ताने, मी आपणा सर्वांना, श्री महिषासूरमर्दिनीचे आख्यान, काव्यरुपात कथन करण्याचा प्रयत्न करते आहे. अर्थात या कवनातील प्रत्येक शब्द माझे सद्गुरू प. पू. श्री अनिरूध्द लिखित "मातृवात्सल्यविन्दानम्" या परमपवित्र
ग्रंथाचा आधार घेऊनच लिहिलेला आहे. म्हणूनच हे काव्य मी श्री आदिमाता महिषासूरमर्दिनी आणि प. पू. अनिरूध्दांच्या चरणी अंबज्ञतेने अर्पण करते.
- डाॅ. प्रिया कर्णिक.
॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ ॥नाथसंविध॥
Wednesday, 25 September 2024
Monday, 26 August 2024
Saturday, 29 June 2024
रामसेवक- राघवादित्य
रामसेवक- राघवादित्य
१) युद्धात ऐन वेळेस रामसेवकच ह्या भावंडांना सहाय्य करणार आहे.३/१४६
२) तो धर्मलेखेला म्हणतो,
ज्या कुळाला तू तुझे माहेर केले आहेस,त्याला
मी बट्टा लागू देणार नाही आणि तुझ्या
माता-पित्यांनाही नाही.
३) धर्मलेखा रामसेवकाला म्हणते,
' तुमच्या सहाय्याशिवाय गेल्या ५२ वर्षांची वाटचाल खूपच कष्टाची झाली असती'
असे म्हणून ती त्याला प्रणाम करून आशीर्वाद मागते.
४) फक्त एकट्या रामसेवकास ठाऊक होते की,
भागवतानंदांचा शब्द हीच विजयरुद्रांच्या
मायानगरीत शिरण्याची व काहीही करण्याची गुरुकिल्ली होती.
५) युगानुयुगे विजयरुद्र व धर्मलेखा असेच जन्म घेतात- केवळ धर्मकार्यासाठी👈 हे राम सेवक नीट जाणतो.तसेच 'धर्मलेखा विजयरुद्रांच्या पक्षात आहे व विजय रुद्र धर्मलेखेच्या पक्षात आहेत ' -हे ही तोच नीट जाणतो.
६) ह्या रामसेवकाकडे अग्निबंधन विद्या आहे व जांबुवंताची गदा आहे ..३/१२८
७) रामसेवकाकडेच संपूर्ण भारतवर्षाचा इतिहास
काटेकोरपणे लिहून ठेवलेला आहे.
८) हा रामसेवक प्राणहीन आहे तरीही जिवंत आहे.
९) हा दररोज एक घट्ट मृत असतो व एक घट्ट जिवंत आणि हे चक्र चालूच आहे.
१०) ह्याचे पंचप्राण वासुकीच्या प्रासादात जतन करून ठेवले आहेत.
११) ह्याचे मूळ नाव लेखाधर्म आहे.ह्याच्या उलट नाम धर्मलेखा.
१२)ब्रह्मसभेने धर्मलेखेची संपूर्ण जबाबदारी सदैव ह्याच्याकडेच सोपवली आहे.
१३) ह्याने जे घडवून आणले ते पाराशर-संहिता व हनुमत्-विद्येचा विनियोग करून.
१४) हा जगणार की मरणार हे युद्धाच्या अंतीम दिवशी ठरणार आहे.कारण घृणातिशया व अहमहिका एकत्र येतील तेव्हा जो स्फोट घडेल तेव्हा ह्याचे जीवन संपू शकते.
१५)ह्याचे कार्य त्या लढाईच्या अंतिम क्षणाला
संपलेलेच असणार आहे, असे तो म्हणतो.
१६) ह्याचे रूप तंतोतंत धर्मलेखेसारखे आहे.व तो स्त्री रूप घेऊ शकतो.वाईट शक्ती स्वीकारू शकतो.व ह्याचे कर्तृत्व व प्रेम अतर्क्य आहे.
१७) ही एकमेव अशी व्यक्ती आहे की ज्याला आपल्या माता- पित्यांमधील सांकेतिक भाषा व लिपी समजते,जी इतर कुणालाही ठाऊक नाही.
१८) हा स्वतःपेक्षाही ,स्वतःच्या पत्नी अपत्यांपेक्षाही
अधिक प्रेम धर्मलेखेवर करतो.त्यांचे नातेच तसे विलक्षण, अद्भुत व पवित्रतम आहे.
Important Points from Aniruddha's Agralekh Discussion Group
Tuesday, 11 June 2024
रसमाधुरीविद्या,इलाविद्या,इलाभंगविद्या व विजयमाधुरीविद्या
सद्विद्या नं ८७ ते९०
रसमाधुरीविद्या,इलाविद्या,इलाभंगविद्या वविजयमाधुरीविद्या
कथामंजिरी १४२
१) केशवादित्याला व रसमाधुरीदेवीला
इलादेवींनी रसमाधुरीविद्या शिकवली आहे.
२)विजयरुद्रांकडून रसमाधुरीदेवींनी तिच्या मातेवरील प्रेमासाठी इलाविद्या शिकून घेतली होती.
३) विजयरुद्रांनी ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांकडून धर्मलेखेसाठी इलाविद्या शिकून घेतली होती.
४)परंतु धर्मलेखेने इलाविद्येच्या विरुद्ध असणारी
अशी इलाभंगविद्या स्वतःच्या पातिव्रत्यानेच सिद्ध करून ठेवली होती.
५) त्यामुळे विजयरुद्र व रसमाधुरी इलाविद्येचाच
काय, तर इलाविद्येबरोबर रसमाधुरीविद्येचाही
वापर करू शकणार नव्हते.
६) परंतु केशवादित्य एकटाच असा आहे की,
जो इलाविद्या शिकून झाल्यानंतर,तिच्यातच
प्रयोग करून इलाभंगविद्या निष्प्रभ करणारी
विजयमाधुरीविद्या तयार करू शकेल.
७) कारण इलादेवींनी एकट्या केशवादित्याला शिवशासनम् ग्रंथातील शेवटचे प्रकरण शिकविले आहे.
८) आणि हे अन्वयेलाही ठाऊक नाही की,इलाभंगविद्येचा भंग करण्यासाठी लागणारे पवित्र सहाय्य ,शिवशासनम् ग्रंथामधील त्या शेवटच्या प्रकरणात आहे.
९) आता प्रश्न उभा राहिला आहे कारण
केशवादित्य रसमाधुरीविद्या व्यवस्थित जाणतो;
परंतु रसमाधुरीदेवींनी त्याला इलाविद्या शिकवली नाही.कारण त्या त्यासाठी तयार नाहीत.
१०) विजयरूद्र धर्मलेखेला शपथबद्ध असल्यामुळे,
केशवादित्याला इलाविद्या शिकवू शकत नाही.
११)इलाविद्या केशवादित्यास रसमाधुरीदेवी पण शिकवू शकत नाही व इलादेवीसुद्धा शिकवू शकत नाहीत कारण
अन्वयाच्या अनुभवावरून इलादेवी व रसमाधुरीदेवी एकमेकींच्या रूपात पाहिजे तेव्हा
वावरत असाव्यात.
१२) पण इलादेवींच्या रूपातील रसमाधुरीदेवी
केशवादित्याला इलाविद्या शिकवू शकतात.
असे अन्वयेला वाटते.
१३)म्हणून इलादेवींच्या रूपात, रंगेश्वरी गर्भगृहातून बाहेर आलेल्या रसमाधुरीदेवींकडून केशवादित्याने
**इलाविद्या* शिकून घेतली.
.१४) पण केशवादित्यास इलाभंगविद्येला निष्प्रभ
करणारी विजयमाधुरीविद्या तयार करावयाची होती.
व त्यासाठी त्याला धर्मलेखेची अशी गोष्ट हवी होती जिचा संबंध विजयरुद्रांशी असतो.
१५) केशवादित्यास विजयरुद्रांनी दोन वेळा
वृद्ध रूप घेऊन जाण्यास बजावले होते ते आठवताच त्यांच्या डोळ्यांसमोर धर्मलेखा उभी राहिली.आणि त्याला तिची स्वतःच्या हातातील मुद्रिका तिच्या नथीस लावून विजयरूद्रांचे स्मरण करण्याची सवय आठवली.
ही सवय धर्मलेखेच्या मायानगरीतील गुप्त कक्ष निष्प्रभ करतानाही केशवादित्याने पाहिली होती.
त्यानंतर त्याला आठवले की,इलादेवी
धर्मलेखेची मायानगरी बनल्या आहेत.
मग त्याला खात्री पटली की,नथ व मुद्रिका ह्यांच्या मध्येच इलाभंगविद्या असणार.
म्हणून तो व रसमाधुरीदेवी धर्मलेखेच्या आश्रमात गेले. तिथे धर्मलेखेच्या कपाटात त्यांना नथ व मुद्रिकेबरोबर त्या पेटीच्या तळावर इलाभंगविद्येचा
मंत्र धर्मलेखेच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेला दिसला.
१६) हे सर्व विजयरुद्रांना
सांगताच, त्यांना धर्मलेखेने प्रेमाने दिलेला वासुकी नागमणी आठवला.व तो त्यांनी आपल्या कंठकूपातून काढून केशवादित्याच्या मस्तकावरील केसात लपविला.
अशाप्रकारे केशवादित्यास इलाभंगविद्या निष्प्रभ करणारी विजयमाधुरीविद्या तयार करणे शक्य झाले.
वैश्विक इतिहास Vaishvik Itihas Family Tree
TO READ THE PDF OF FAMILY TREES.
: It's now in pdf format. Click this text link.
After zooming in please wait for few Seconds to get clear picture .
Hari Om Shree Ram Ambadnya
Saturday, 25 May 2024
भगवान वासुकी
भगवान वासुकी
भगवान शिवाच्या गळ्यात नित्य असणारा भगवान वासुकी म्हणजे , शिवाच्या ध्यानावस्थेत दक्ष असणारा त्याचा दास.
भगवान वासुकी हा शिवाचा दास्यभक्त आहे आणि त्याला अमृतमंथन करण्याचे सामर्थ्य आहे .
भगवान वासुकी म्हणजे भगवती पार्वतीचे पातिव्रत्य आणि त्यासाठी तिने केलेला केलेला त्यानं ह्यांचे मूर्त स्वरूप.
प्रेम, व्रत व त्यागरूप असणारा वासुकी हा अज्ञानगंज चा खराखुरा अंतिम सत्ताधीश आहे .
शिवाच्या गळ्यात असतानाच, पाताळलोकातील नागलोकाचा स्वामीही आहे व तेथेही निवास करतो.
भगवान वासुकी ची पत्नी शतशीर्षा ही शिव-पार्वतीच्या दयेचे स्वरूप आहे.
वासुकी भगिनी मनसादेवी ही शिव-पार्वतीच्या असुरांवरील क्रोधाचे स्वरूप आहे .
Reference: Katha Manjiri 3-135, Article, written in Daily newspaper by Sadguru Aniruddha Bapu (Dr. Aniruddha Joshi) . Visit and register on www.tulsipatra.in to read Katha Manjiri Agralekh series.
Hari Om Shree Ram Ambadnya Naathsanvidh
Friday, 12 April 2024
शुभात्रेयी
🌻शुभात्रेयी🌻
कथामंजिरी ३/११७ व तुलसीपत्र १४९८
ह्या अग्रलेखात ब्रह्मवादिनी शुभात्रेयींचा उल्लेख आला आहे.
याज्ञवल्क्य सांगतात,मंत्रगजर चोरणे म्हणजे
दत्तात्रेयभगिनी शुभात्रेयीदेवींच्या पादुका चोरणे.
ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे भगवान अत्रि व भगवती अनसूया ह्यांची कनिष्ठ कन्या अर्थात् भगवान दत्तात्रेयांची सख्खी धाकटी बहीण.
ही दत्तात्रेय भगिनी सदैव माता-पित्याबरोबर राहून त्यांची सेवा करीत असते.व हिलाच स्वतः अनसूयेने त्रिविक्रमाची उपासना देण्याची प्रथम दीक्षा
सत्ययुगातच दिलेली आहे- जेव्हा वेद लिहिले जात होते.भगवान त्रिविक्रमाच्या भक्तांची काळजी घेणे
हाच तिचा निर्धार आहे.
हिचा त्रिविक्रम कसा आहे हे तिच्याच शब्दांत,
⬇️
ज्याच्या मस्तकी राहती श्रीदत्त।
जगदंबा करी निवास ज्याच्या हृदयचित्तात
हनुमंत स्वतः आहे ज्याचे हस्त
असा असे हा एकमेव अद्वितीय त्रिविक्रम दत्त प्रदत्त।
ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे त्रिविक्रमाची माता
श्रीविद्या हिचे मानवी स्वरूप आणि म्हणून
शुभात्रेयी ही त्रिविक्रमाची माताच.
हिने मंत्रगजर सर्व श्रद्धावानांसाठी खुला केला.
ह्या दत्तात्रेय भगिनीस अर्थातच मृत्यूचे बंधन नाही.
काळाचे बंधन नाही.
परंतु तिने स्वतःचे सर्व तपोबळ तिच्या पादुकामध्ये ठेवून दिले आहे.
केवळ एकाच गोष्टीसाठी - श्रद्धावानाकडे पुण्य जराही नसले,तरीदेखील त्याला मंत्रगजर करता यावा म्हणून.
ह्या तिच्या पादुका हिमालयातील एका गुप्त स्थानावर सुरक्षित ठेवल्या गेल्या आहेत.कारण त्रिगुणात्मक त्रैमूर्ति भगवान दत्तात्रेयांच्या रचनेनुसार
जोपर्यंत ह्या पादुका अशुद्ध जलात विसर्जित होणार नाहीत,तोपर्यंत हा महामंत्र, हा मंत्रगजर
श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ बलस्थान असेल व ते
बलस्थानच ह्या दुष्ट परंपरेला चोरावयाचे आहे.
Monday, 8 April 2024
संजीवनी विद्या
ही संजीवनी विद्या महादुर्गेची शक्ती व त्रिविक्रमाची सिद्धी आहे.
ही विद्या फक्त शुक्राचार्यांच्याच ताब्यात राहिली.
ह्या विद्येवर बफोमेटलाच काय स्काली व अंकारालासुद्धा तिच्यावर ताबा मिळवता येणे
शक्य नाही.
शुक्राचार्यांच्या पहिल्या दोन्ही कन्या
दिती व दनु ह्या दोघींकडेही अल्प संजीवनी विद्या आहेच- खंडित अवयव नीट करण्यासाठी.
शुक्राचार्यांनी संजीवनीविद्येचा उपयोग करून वालीचे सहस्त्रार्जुनाने तोडलेले हात परत जोडून दिले होते.
शुक्राचार्यांकडे ही संजीवनी विद्या
किरातकालामध्ये ( किरातकाल ९) ब्रह्मर्षि वसिष्ठांच्या शापामुळे निष्क्रिय अवस्थेत होती.
Notes from - Aniruddha's Telegram Discussion Group
Thursday, 4 April 2024
Tarini Vidya
सद्विद्या नं ४४
तारिणीविद्या
तुलसीपत्र १३२०
भाबड्या भक्तिभावाने आचरण करणे व मन
श्रीचण्डिकाकुलाविषयी निर्विकल्प करणे-
ही एकच गोष्ट अगदी सामान्यातल्या सामान्य मानवापासून महर्षिपर्यंत प्रत्येकाने आपापल्या
कुवतीनुसार करणे,
ही एकमेव तारकशक्ती आहे, तारिणीविद्या आहे अर्थात् पश्यंतीवाणी आहे.
तारिणीविद्या म्हणजे,
स्वतःच स्वतःला श्रीचण्डिकाकुलाचा नि:संशय
व अविभाज्य घटक मानणे.
कोण म्हणून?
तुमचा इष्टदेवताचा पुत्र म्हणून किंवा कन्या म्हणून,
तसेच एकमेव अद्वितीय असणाऱ्या त्रिविक्रमाला
एका स्तरावर 'पिता':दुसऱ्या स्तरावर 'मित्र' व
तिसऱ्या स्तरावर ' आपले अंतिम साध्य व ध्येय' मानणे.
Sunday, 31 March 2024
Saturday, 23 March 2024
# सिद्धयोगी #ज्ञानगंज
# सिद्धयोगी Anand Rudra
* प्रौढ, उमदा, देखणा राजपुरूष
* चिदानंदचे तंतोतंत प्रौढ स्वरूप
* प्रापंचिक - विवाहित
* युवराज आकाशकुक्षचा अत्यंत जवळचा आप्त. त्याची माता ही सिद्धयोगीची ही माताच आहे.
* मातेने कानात सांगितलेल्या मंत्र गजरावर विश्वास
* पित्याने शुभ्र धवल घोडा ' राजन ' ( अनेक गुण व कौशल्य असलेला) १८ व्या जन्मदिनी भेट म्हणून दिला - अश्व एक विलक्षण कोडे. इतकी वर्षे लोटली तरी अश्वही तसाच व पिताहि.
* ब्रम्हर्षी गौतमांनी काहीही सांगण्यास नकार दिला, ब्रम्हर्षी याज्ञवल्क्यांनी मंत्रगजर करण्यास फक्त मन हलवून संमती दिली, अहल्येचि माता पूर्णाहुतिने तर कडक शब्दात, भलते धाडस न करण्यास बजावले होते फक्त महर्षि शशिभूषणांनी विचारांना अनुमोदन व कार्यासाठी आशीर्वाद दिले.
* महर्षि शशिभूषण म्हणाले - मी तुझ्यामध्ये माझेच प्रतिबिंब पाहत आहे. तू ज्या मार्गावरून चालू इच्छित आहेस, तो मार्ग सोपा नाही. तू प्रभू रामचंद्रांच्या वनवासगमन मार्गाने जा, तुझा खरा मार्ग सापडेल.
* मंथरेला - घृणातिशयेला शोधायला निघाला. (ती कधी कुबुद्धि, कधी कुविद्येच्या रुपात सर्वत्र वावरत असते, कुणाचाही घात करण्याचे सामर्थ्य तिच्याकडे आहे.)
* कुविद्या शिकण्याची व त्या सर्व कुविद्यांच्या विरुद्ध असणाऱ्या सिद्धी, शक्ती व अस्त्रे ह्यांचा अभ्यास करण्याची तळमळ.
* सिद्धयोगीकडे मातृप्रेम + पितृभक्ती होती आणि ह्यामुळेच ज्ञानगंजमध्ये प्रवेश मिळाला.
* पिता हा जीवनाचा अधिनायक ( hero) होता, आहे आणि राहील. मातेपेक्षा पिता अधिक प्रिय.
* पित्याचे व मातेचे कार्य व नाव यशस्वीपणे चालवण्यासाठी अफाट प्रयत्न.
* पित्यापासून काहीही लपवले नाही मात्र मातेपासून अर्ध्या गोष्टी लपविण्यास माता अहल्येनेच सहाय्य केले.
* माता कैकयीने एक थैली दिली. त्यात रामनामाची मुद्रिका + चिठ्ठी होती. ( ही रामनामाची मुद्रिका भगिनी सुमित्रेने माता कैकयीला दिली होती).
* ज्ञानगंज मध्ये प्रत्येकाने स्वागत केले - असंख्य ब्रम्हर्षी, सिद्ध, भक्त, परमभक्त, सिद्धयोगी, प्रेमयोगी.
* सिद्धयोगीने ज्ञानगंज मध्ये ९ वेळा प्रवास केला.
* प्रत्येक प्रवासात ९ पायऱ्या चढत राहिला. प्रत्येक पायरीवर एक सिद्धयोगी - काहीतरी शिकवीत होता.
* १ल्या खेपस ९ व्या पायरीवर असलेल्या सिद्धयोगीने एक मंत्र दिला व त्याच्या कूटीत नेऊन खूप काही शिकवले.
* 3ऱ्या ज्ञानगंज भेटी नंतर माता कैकयी व लक्ष्मण माता सुमित्रा, ब्रम्हर्षी वासिष्ठांकडे घेऊन गेल्या - वसिष्ठआश्रमात ( महर्षि पवित्रानंद यांचा आश्रम मेघपथ स्थानावरील - मेघनादशक्तीने लक्ष्मणास मूर्च्छित केलेले स्थान). महर्षि पवित्रानंदांनी विधिवत शिष्य करून घेतले, लक्ष्मणविद्या शिकवण्यासाठी. कार्य संपन्न होताच ही विद्या महर्षि पवित्रानंदांकडे परत जाईल.
* दरवर्षीच्या चातुर्मासात महर्षि पवित्रानंद, ७ वर्षे जिथे कुठे सिद्ध योगी असेल तिथे येऊन शिकवू लागले. नंतर दर वर्षी भेटणे होत राहिले. दरवर्षीच्या आषाढ पौर्णिमेला सिद्धयोगी महर्षि पवित्रानंदांना त्यांच्या आश्रमात भेटत आहे.
* एका आषाढयात्रेच्या वेळेस पत्नीवर व तिच्या बंधूवर जीवघेणा हल्ला झाला. ते थोडे बरे झाल्यावरच सिद्धयोगिने परत यात्रा सुरू केली.
* दुसऱ्या यात्रेच्या वेळेस, रथीसम्राज्ञी नर्मदादेवींची कन्या व पुत्र तसेच रथीसम्राट हृषिकेशनाथांची एकमेव प्रिय भगिनी अन्नपूर्णा देवी अकस्मात नाहीसे झाले होते.
* पित्याने व ब्रह्मवादिनी अहल्येने कायम एकच सांगितले की अन्नपूर्णेचा निरोप तिच्या मुद्रेसह आला की तो पाळायचाच.
* अन्नपूर्णाच सिद्धयोगीच्या लक्ष्मणविद्येच्या वापरावर नियंत्रण ठेवू शकते.
* ८ व्या खेपेस ७२ व्या पायरीवर उभा असलेल्या सिद्धयोगीने मंत्रोपदेश, विद्योपदेश, तंत्रोपदेश, योगोपदेश आणि यज्ञोपदेश केला.
* ९ व्या खेपेस, ८१ व्या पायरीवर उभा असलेला सिद्धयोगी हा शिवाचा डमरू - शिवपुत्र - शिवदास - शिवसखा आहे.
* रामनामाचा स्पर्श हीच जिवंतपणाची एकमेव जाणीव
* शेवटच्या पायरी नंतर महाराज वासुकी व प्रत्यक्ष भगवान शिव दर्शन.
* अनेक ज्ञानगंजसिद्धी प्राप्त.
* धर्मलेखा ही विजयरुद्रांना सुद्धा अनेक गोष्टी कळू देत नाही परंतु त्या गोष्टी सिद्धयोगीला ठाऊक असतात. धर्मलेखेला सगळ्यांपेक्षा जास्त ओळखतो, ते केवळ लक्ष्मण विद्येमुळे.
* स्वयंपूर्णादेवी व अन्नपूर्णादेवी यांना नीट ओळखतो. गेली १४ वर्षे ह्या दोघी सिद्ध्योगीला वारंवार भेटत असतात. त्यांच्या सारखीच असणारी तिसरी सदैव त्याच्या बरोबरच असते.
* बद्रीनाथ क्षेत्रामधील धर्मस्थानावर ठेवलेल्या केशवादित्य व अन्वयेचा संरक्षक
* पाण्यातही श्वास घेऊ शकतो.
* अन्नपूर्णेचा सिद्धयोगीवर असीम विश्वास आहे व आशीर्वादही
# सिद्धयोगी
* अवघ्या 2 शस्त्रांनी झाखिणी ( दनुकन्या / प्रतीदनु) व दनुला पळवून लावले.
* ब्रम्हर्षी वसिष्ठ यांच्या आज्ञेशिवाय सिद्धध्यान लावत नाही.
* चरंग ग्रामातील काश रायच्या ( आकाशकुक्ष) प्रसदमध्ये :
√ धर्म लेखेचा हात तिच्याही नकळत सिद्धयोगी साठी आशीर्वादासाठी उंचावला.
√ सिद्धयोगी व विजयादेवींनी मिळून धर्मलेखेस हातावर उचलून वरच्या मजल्यावर नेले
√ सिद्धयोगीचा भाला सर्कीच्या ( Sathadorina - शतकालकुटा छातीत रुतुन बसला, भीषण किंचाळी ठोकत ती पळून गेली.
√ पित्याचा प्रमुख आदेश - पाहिले ते सावधपण
√ सिद्धयोगीलाजवळ घेत धर्मलेखा म्हणते - तू कधीच चूक केलेली नाहीस आणि आजही नाही.
* ' रणधीर रूद्र विजय ' ग्रंथ वाचला आहे.
COMPILATION - Jayashriveera Panchbhai
🌸कथामंजिरी ३/९१🌸
ज्ञानगंज ( सिद्ध भूमी)
सनातन पवित्र धर्म आणि अपवित्र निशाचर तंज्ञमार्ग.हे एकाच चुंबकाच्या दोन ध्रुवांप्रमाणे
(Poles) आहेत.
व हयाचे शिक्षण व उपदेश ज्ञानगंजमध्ये
व्यवस्थित शिकल्यावरच त्या दोन ध्रुवांच्या बरोबर मध्यावर असणारा एक वेगळाच महामार्ग प्राप्त होतो.
३/१०९
🌑अज्ञान गंज -अंध:कारगंज (दुर्गतिभूमी)🌑
ह्या विश्वात जसे ज्ञानगंज आहे तसे अज्ञानगंजही आहे.
कंटकेच्या कानात अज्ञानगंजच सांगत होता
- होय! ही खरीखुरी धर्मलेखा आहे.
🍂३/११५-११६ कथा मंजिरी
ज्ञानगंजाच्या स्वामीस, हैय्यवाॅनस ग्रंथात,
सुरथाने भावपिता म्हणून संबोधिलेले आहे.व
ह्या ज्ञानगंजस्वामींची कन्या भाव कन्या आहे.
ह्या ज्ञानगंजस्वामींची निवड स्वतः त्रिविक्रमाने केली
आहे.
🖕
ह्या ज्ञानगंजस्वामींसाठी प्रकाश व
अंध:कार हा भेदच नाही.ते अंध:काराचे रुपांतर
प्रकाशात करु शकतात आणि त्यांना आवश्यक वाटल्यास प्रकाश रोखून ठेवू शकतात.हे कुविद्या व निशाचर विद्या वापरुनही पवित्रच राहतात व ते फक्त
त्रिविक्रमाचीच गोष्ट ऐकतात.
हे ज्ञानगंजस्वामी अज्ञानगंजच्या सत्ताधीशास
शत्रू म्हणत आहेत.
👆
हा शत्रु....
पुरुषनावाने ( 'युद्धपिता, द्वेष पिता')
व स्त्री नावाने मत्सरा.म्हणून हैय्यवाॅनस ग्रंथाद्वारे
ओळखला जातो.
आपण आता हे लक्षात घेऊन की,
त्याच ग्रंथात ज्या अज्ञानगंज सत्ताधीशाला
राजा सुरथाने 'अभावपिता'
ह्या नावाने संबोधिलेले आहे.त्याची कन्या
अभावकन्या आहे.
व ज्ञानगंजस्वामी व ह्या अज्ञानगंजच्या सत्ताधीशाने
मिळून तयार केलेल्या कन्येचे नाव मृगजला
व अपूर्णा आहे.
आता ज्ञानगंजस्वामींची भावकन्या व वरील
अभावकन्या
दोन्हीही रुपे धर्मलेखेचीच आहेत.असे धर्मलेखा विजयरुद्रांना सांगत आहे.म्हणून ती म्हणते,
मी दोघांचीही कन्या आहे.
ह्यातील भाव कन्या
विजयरुद्रांची धर्मलेखा पूर्णा आहे.
व अभावकन्या सुद्धा धर्मलेखा आहे.पण हिचे बीज
अभावाची भावना ईश्वराकडे नेते.
व दुसरी अपूर्णा म्हणजे दोघांनी तयार केलेली मृगजला भ्रामक आहे. जी अभावाची भावना मानवाला अशुभ मार्गावर नेते.तिचे बीज कंटकेमध्ये आहे जी
प्रतिधर्मलेखा आहे.व तीच अपूर्णा - मृगजला ( भ्रामक)आहे.
विजयरुद्रांचे चुकुनही दुरुनही अभावाशी
नाते नाही;कारण ते शुद्ध सख्यभक्तिभाव आहेत.
म्हणून त्यांचे नाते ज्ञानगंजस्वामींच्या कन्येशी
भाव कन्येशी आहे.कारण प्रेमभक्ती अर्थात् सख्यभक्ती व दास्य भक्ती एकत्र आल्यावर अशुभ मार्ग उरतच नाही.म्हणून विजयरुद्र फक्त एक ज्ञानगंजस्वामींचे जामात आहेत.
धर्मलेखा म्हणते मी अभावपूर्णासुद्धा आहे.
(अपूर्णा नव्हे.)
कारण १) जेव्हा मानवाला अभावाची जाणीव होते,
तेव्हाच तो शोध घेऊ लागतो.ज्याचा शोध पवित्र मार्गाने चालतो,तो ईश्वराला पूर्णभाव व स्वतःला
अंशभाव मानून दास्यभक्तीकडे वळतो.
आणि जेव्हा, २) मानव शोध घेण्यासाठी अपवित्र मार्गाचा अवलंब करतो,असत्याचा अवलंब करतो,
अर्थात् दुष्ट बुद्धी वापरतो,तेव्हा तो निशाचर मार्गाकडे वळतो.व कायम मृगजळामागेच
धावत राहतो.व अपूर्णच राहतो.
ह्यामुळे अभावाची भावना चांगलीही आहे आणि
वाईटही आहे.
जी अभावाची भावना ईश्वराकडे नेते तिचे बीज धर्मलेखेत आहे.अभावपूर्णात आहे.
व जी अभावाची भावना मानवाला अशुभ मार्गावर
नेते,तिचे बीज कंटकेमध्ये अर्थात्
अपूर्णामध्ये आहे.
Aniruddha's Agralekh Discussion Group on telegram Notes
तो ज्ञानगंज स्वामी त्या सिद्धभूमीच्या बरोबर मधोमध असणाऱ्या एका विशाल वटवृक्षाखाली राहतो . तो वटवृक्ष प्रलयात देखील लय पावत नाही . ह्या वटवृक्षाच्या एका पानावरच म्हणे , ह्या पवित्रमार्गीयांचा देव प्रलयजलावर तरंगत राहतो . ❤️ कथामंजिरी ३/११६
Thursday, 14 March 2024
Saturday, 9 March 2024
Vijayrudra Family Tree
Friday, 8 March 2024
महर्षि पवित्रानंद ( ऋषि कल्मषपाद) Pavitranand Family Tree
🌄 महर्षि पवित्रानंद Ref.kathamanjiri 3/92
ब्रह्मर्षि वसिष्ठ
⬇️
वंशज
महर्षि पवित्रानंद.
( कल्मषपाद)
कल्मषपाद हे नाव ऋषिवर्यांनी मुद्दाम धारण केलेले आहे.
ह्या नावाने त्यांनी सर्व कुविद्या,तसेच सर्व तंत्रविद्या शिकून घेतल्या व सनातन धर्मियांसाठी अनेक पवित्र गोष्टी तयार करुन ठेवल्या.
ते फक्त चातुर्मासात वसिष्ठ आश्रमात येऊन राहतात.बाकीचे आठही महिने ते सनातनधर्मियांचे
रक्षण करण्यासाठी अगदी सर्वत्र फिरत राहतात.
ह्यांची पत्नी महामति इरावती ही सुद्धा ह्यांच्याइतकीच सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण आहे.
ह्या दोघांनाही त्यांच्या धाडसी उपक्रमामध्ये स्वतः
गुरु वसिष्ठांनीच सहाय्य केले होते
हेच सरस्वतीदेवीचे पिता व माता आहेत.ह्यांना एकूण ११अपत्ये आहेत.
त्यातील चार म्हणजे
१) सरस्वतीदेवी
२) रामप्रसाद शर्मा
३) शिवप्रसाद शर्मा
४) शिवप्रियादेवी
ही सर्व अपत्ये ह्यांच्याकडे कमीतकमी तीन सामर्थ्यांनी युक्त आहेत.ह्यांच्या ११ अपत्यांनी,
ऋषियान साम्राज्यासह भारतवर्षातील नऊही
साम्रांज्र्यांशी निकटचे आप्त संबंध केलेले आहेत.
व ते सतत कार्य करतच असतात.
मेघनादाने स्थापन केलेल्या ' मेघपथ' ह्या स्थानावरच महर्षि पवित्रानंदांनी त्यांचा आश्रम सुरु केला होता व त्याबरोबर गुरु वसिष्ठांनी त्या आश्रमास आपलाच एक आश्रम म्हणून घोषित केले.
COMPILATION: Mohiniveera Kurhekar
Tuesday, 5 March 2024
How reading Katha Manjiri and Agralekh are beneficial for us.
हरिः ॐ
1. कथामंजिरी १/२/३..base हा वैश्विक ईतिहासाशी निगडित आहे.
कथामंजिरी २ ही गुरुनाम, गुरूपादुका,'मंत्रगजर' महात्म्य यांनी ओतप्रोत भरलेले आहे ..
कथामंजिरी ३ ही परत गोष्टीरुप असून, वैश्विक ईतिहासाला जोडलेली आहे..
2. कोणताही अग्रलेख हा आपल्याला दिवसभर positive vibrations देत रहातो.
बापुंबरोबर संवाद साधत रहातो....जे बापुला अपेक्षित असते....( भक्तीभाव चैतन्य संवादात जे आपण ऐकतो.....'त्याच्याशी बोलत रहा'..'आपले बोलणे त्याला आवडत असते'...)
3. 'आपल्याला फायदा हा कशापध्दतीने होऊ शकेल'?...हा बापूचा मार्ग ! 'माझे बाबा त्यांचा अमूल्य वेळ खर्च करुन हे लिहीतोय ना आपल्यासाठी मग ते वाचायचच...जो भाग समजेल ती बापूची ईच्छा आणि जो भाग नाही समजू शकणार त्यावर विचार करायला लावणे हीपण बापुचीच ईच्छा....
4. तुलसीपत्र 1640 मध्ये - देवर्षी नारदांनी आणि कांचनवर्मा यांनी कथामंजिरी बद्दल उत्कृष्टरित्या समजून सांगितले आहे.
5. या व्यतिरिक्त, कथामंजिरी द्वारे मी काय अनुभवत आहे, सक्रिय ऑनलाइन उपस्थिती (सहभागी) होऊन , सखोल विचार आणि या चर्चांद्वारे विविध दृष्टिकोन स्वीकारणे, नोट्स बनवण्याचे महत्त्व इ. कळून येते
6. कथामंजिरी सोबत राहणे म्हणजे एक आनंद देणारी उपासनाच आहे. बापूंच्या सोबत राहण्याची एक उचित संधी आहे. मज्जाच मज्जा. लहान मुलांना कशी आज्जी गोष्ट सांगते व मुले कान देऊन व उत्सुकतेने कथा ऐकतात. एन्जॉय करतात. तसेच आपण बापू सांगतील ती कथा उत्सुकतेने ऐकतो व एन्जॉय करतो.
7. अग्रलेख एक असून सुद्धा - जितके श्रद्धावान कथा मंजिरी वाचत आहेत ना तितके भाव दृष्टीकोण पॉईंट बापू तयार करून घेतात (प्रत्येकाच्या हृदयात, बुद्धीत, मनात, चित्तात व त्याच्या जगात )
8. अग्रलेख वाचणे म्हणजे बापूंचे शब्द ऐकणे. बापू सोबत बोलण अग्रलेखाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो . खूप सुंदर लेख आहेत. त्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. बुद्धीला चालना मिळते. असे वाटते प्रत्येक अग्रलेख समीर दादां बरोबर बसुन समजून घ्यावे. पुन्हा नव्याने ह्या गोड शाळेत प्रवेश घ्यावा. काय गोड गुरूची शाळा
9. कथामंजिरी, वरुन समजते की आपल जीवन फार इज़ी आहे. त्या सर्वानी किती त्याग, त्रास आणी बरेच काही सहन केले. आपल्याला थोडे तरी त्यांच्या कडून शिकता आले पाहीजे.
• मंत्र्गजर..भक्ती.
• विश्वास.
• धर्मलेखा व विजयरुद्रंचे प्रेम.
• केशवदीतयचा विश्वास..
• आंनदरूद्र ची नित्य उपासना.
• आणी बरेच काही.
• विविध मंत्राची ताकद.
• त्रिविक्रमा वरिल खुप खुप प्रेम,भक्ती,विश्वास आणी सर्वस्व.
10. यासोबत कथामंजिरी बद्दल म्हणाल तर, बापूची कोणतीही गोष्ट ही 'फायदा- तोट्याच्या' पार पलिकडे असते....त्याच्या बाळांच्या विकासासाठी असते...जी त्याच्या कळकळीतून आणि तळमळीतून दिसून येते...'अकारण कारुण्य आणि लाभेविण प्रेम'. जे 'श्रीसाईसत्चरित्रातही' ठायी ठायी दिसत. (सद्गुरुतत्त्वाच्या 'लीला' समजणे अत्यंत कठीण.)
11. कथामंजिरी का वाचायची म्हणजे आईच दूध का प्यायच विचारण्या सारख आहे. आईच्या दूध.. शरीराला कसे पोषक असत. त्याने काय काय फायदा होतो. हे विचारत बसत का बाळ.? दूधातले ingredients त्या मागील science माहीत असत का?..की माहीत करुन घेईन मगच पिईन ..अस म्हणत का बाळ.?....नाही ...तसेच आम्हा श्रद्धावानचे, बापू रुपी आई कथामंजिरीद्वारे (दुधाद्वारे) श्रद्धावानस काय काय देते हे अनुभवने महत्वाचं .. कधी एकदा तर .. अशी स्थिती होते ..अरे आज पेपरवाल्याने प्रत्यक्ष टाकला नाही .. आणि नेमका "मंगलवार" .. अरे यार ! Pls फक्त अग्रलेख मिस झालाय ही रुखरुख राहते, तरी यावर ही उपाय करून दिला बापूनि हिंदी अग्रलेख देऊन !!... अशी आमच्या सारखी, अगदी तशीच स्थिती अग्रलेख वाचणार् या आम्हा प्रत्येकाची होत असते. सरतेशेवटी कथामंजिरी म्हणजे वाघिणीचे दूधच, म्हणून आम्ही श्रद्धावान कथामंजिरी वाचतो.
तू धेनू मी वासरु
तू माय मी लेकरु
पाजी "कथामंजिरी" प्रेम पान्हू अनिरुद्धे ...
हरी ओम | श्रीराम | अंबज्ञ | नाथसंविध्
Discussion : Agralekh Discussion group Shraddhawan
Compilation : Harshaveera Chavan
Friday, 1 March 2024
TULSIPATRA 1108 IMP POINTS
🏹 हर्क्यूलिस🏹
तुलसीपत्र ११०८
संपूर्ण नि:स्वार्थी वृत्ती,अत्यंत देखणा असूनही
निग्रहाने पाळलेले ब्रह्मचर्य, 'पावित्र्य हेच प्रमाण'
हा एकमेव निकष, मातृधर्म व मातृभूमीवरील आत्यंतिक निष्ठा व त्याचा सतत चाललेला महादुर्गेचा मनोमन जप ह्यामुळे त्याला शरीरात
असतानाच त्रिविक्रमाने दिव्यत्व बहाल केले आहे.
आज तो मानव असूनही पूर्णपणे दिव्य कोटीतील आहे.
🌷ॲफ्रोडाईट🌷
तुलसीपत्र ११०८
ॲफ्रोडाईट ही त्रिविक्रमाने मानवांच्या
सहाय्यासाठी उत्पन्न केलेली 'अरुला' नामक शक्ती आहे.व चण्डिकाकुलाच्या न्यायाने ती त्रिविक्रमाची
सख्खी जन्मजात भगिनीच आहे.मानवी मनातील श्रद्धा हे तिचे मूलतत्त्व आहे व मानवाच्या सद्गुणांना विकसित करत राहणे व त्यासाठी
मानवांना त्यांच्या त्यांच्या पवित्र कार्यक्षेत्रांमध्ये
सदैव प्रेरित व आकर्षित करीत राहणे,हेच तिचे
सहजकार्य आहे.परंतु तिच्याकडील ह्या आकर्षण शक्तीमुळेच सर्व दुर्जनांना तिची हाव असते.व हा मोठा अडथळा तिच्या कार्यात सतत येत राहतो.
जेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम ।
तेथे तेथे कर्ता मी त्रिविक्रम।
तुलसीपत्र ११०८
बिजाॅयमलानाला डेमेटरने सांगितले
ते असे,
⬇️
श्रद्धेला सदासर्वकाळ सहाय करतो,तो 'श्रद्धावानांच्या मनातील अनन्यभाव'.
आणि असा अनन्यभाव प्रिय हर्क्यूलिसच्या
मनामध्ये दैवी स्तरावर त्रिविक्रमाच्या चरणी
आहे.व मानवी स्तरावर त्यांचे तसेच अनन्यप्रेम
ॲफ्रोडाईटवर आहे.परंतु ॲफ्रोडाईटचे दिव्यत्व
लक्षात घेऊन त्याने कधीदेखील आपली मर्यादा
सोडली नाही.अंतराळात युद्ध करताना त्रिविक्रमावर
अनन्यश्रद्धा ठेवून ॲफ्रोडाईटच्या कार्यासाठी जे भीषण साहस केले,त्याक्षणी हर्क्यूलिसची श्रद्धा व हर्क्यूलिसचे प्रेम आपोआप एकरूप झाले व
सदैव सर्व जाणणाऱ्या महादुर्गेने
हर्क्यूलिसच्या अस्तित्वाला दिव्यत्व बहाल केले.
म्हणून तो पूर्णपणे 'मानव' कोटीतीलही आहे
आणि 'दिव्य' कोटीतीलही.
डेमेटर बिजाॅयमलानाला सांगते,
हर्क्यूलिस हा देवत्व कधीच स्वीकारणार नाही.
कारण त्याला सदैव त्रिविक्रमाचा अत्यंत प्रिय
भक्त व मित्र म्हणून रहायचे आहे.तो एकमेव आहे व
एकमेव असेल.कारण तो दिव्य मानवही नव्हे तर
मानवी देहातील 'दिव्य भाव' आहे व असेल.
COMPILATION: Mohiniveera Kurhekar
शंबलानगरी
शंबलानगरी
🍃तुलसीपत्र १२३९
ॲब्रॅक्ससने ॲगार्था नगरीचा विकास घडवून आणताच, तिच्याच विरुद्ध टोकाला त्रिविक्रमाने
शंबलानगरीची स्थापना केलेली आहे.
ह्या नगरीची सम्राज्ञी आहे 'अमृतमोहिनी.'
हिलाच त्रेतायुगात शांतला नावाने ओळखले जाते.
द्वापारयुगात 'याज्ञसेनी' म्हणून ओळखली जाते.
आणि कलियुगात ' सुभद्रा' म्हणून ओळखली जाते.
Wednesday, 21 February 2024
FAMILY TREE , PARVAT SAMRAJYA
Friday, 16 February 2024
लक्ष्मणविद्या
कथामंजिरी ३/९२
🏹 लक्ष्मणविद्या 🏹
ही लक्ष्मणविद्या फक्त महर्षि पवित्रानंदच शिकवू शकतात.
शशिभूषण व पूर्णाहुतिनकडे जे आहे, त्यांच्याहीपेक्षा अधिक बलवान अशी ही लक्ष्मणविद्या आहे.
ह्या विद्येचे कार्य संपन्न होताच ही पुन्हा महर्षि
पवित्रानंदांकडे परत जाते.
ही लक्ष्मणविद्या वापरायची, तर वापरणाऱ्याचे
मूळ रूप, नाव, धर्म,गुणधर्म ह्यापैकी काही देखील शत्रूस कळणार नाही असेच रूप घ्यावे लागते व
मगच त्या शत्रूवर प्रहार करता येतो. ही विद्या वापरताना बीभत्स रूप घ्यावे लागते.
म्हणून त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.
( Compilation: Mohiniveera Kurhekar)
Wednesday, 14 February 2024
ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य - देवर्षि नारदांचा मानवी अवतार आणि महानाद
प्रजापति ब्रह्मा
⬇️
ब्रह्मर्षि ब्रह्मबाहु
⬇️
याज्ञवल्क्य ( देवर्षि नारदांचा मानवी अवतार )
⬇️
तीन पत्नी
🌀१) कात्यायनी ( नारदाची चिपळी)
🌀२) मैत्रेयी (नारदाची वीणा)
🌀३) गार्गी वाचक्नवी ( नारदाची शेंडी)
कात्यायनी प्रथम पत्नी 🌀
⬇️ पुत्र
१) महर्षि चंद्रकांत
२) ब्रह्मर्षि महामेघ 🌀पत्नी महामती श्रद्धा
⬇️
पुत्र महानाद (वय सदैव-
१३ वर्षे ) (जगदंबेच्या हातातील मणीभद्र कंकणाच्या ध्वनीतून जन्म)
३) गृहस्थाश्रमी विजय
Monday, 12 February 2024
Sunday, 11 February 2024
चिरंतन - निरंजननाथ - निरंजनवर्मा
# चिरंतन - निरंजननाथ - निरंजनवर्मा
*वय 50- 52 वर्षे
* अंत्यत देखणा, उमदा आणि बलदंड पुरुष
*धर्मलेखेचा आवडता शिष्य
*महंत गंगाधर स्वामींच्या खास विश्र्वासातील.
*धर्मलेखा म्हणते - मी सगळ्यात जास्त तुझीच आहे.
*धर्मलेखा महिन्यातून एकदा भेटायची, वयाच्या 16 वर्षानंतर वर्षांतून एकदा आणि गेल्या 7 वर्षात एकदाही भेटली नाही.
*सरस्वतीदेवींनी पैशाची भाषा, लिपी शिकवली व गंगाधर स्वामींनी पैशाच्ची भाषा व ग्रंथ शिकवले.
*निशाचरांचा अंतिम ग्रंथ अभ्यास चालू
*नाथपंथीय सर्व सिद्धी स्वतः शिवस्वरूप गोरक्षनाथांनी दिलेल्या.
* शरीरशास्त्र ( anatomy & physiology) जाणकार
* सर्वश्रेष्ठ संगणक शास्त्रज्ञ
* गोरक्षविद्या अवगत
* अवंतिका 3 वर्षांपूर्वी पशुपतीनाथ मंदिरात भेटली. एक नागीण तिच्या अंगावरुन सळसळत गेली. चिरंतन व त्याची माता बाजूच्याच कक्षात बोलत होते. "नागिणीचे बीळ आमच्याच कक्षात उघडते, मीच त्या नागिणीला नीट ओळखतो".
* महर्षी शतानंद म्हणाले - तू आमच्या ब्रम्हर्षी सभेचा प्रतिनिधी म्हणून ह्यापुढे कार्य करशील. तुझ्या मातेच्या संरक्षणाची जबाबदारी तिच्या भगिनीवर सोपवली आहे.
* कुनलून ची प्रेयसी - विंबी ( सिंहिका राक्षसी - रामायणातील राक्षसी - समुद्राच्या जलावर पडणाऱ्या सावलीस खेचून, आकाशात उडणाऱ्या कुणालाही खाऊन टाकू शकणारी- वृत्रासुराची कन्या) ला ठार केले.
*विजयरुद्र व धर्मलेखेच्या पहिल्या वर्तुळातला आहे. He knows everything.
* घृणातिशयेला छोट्या संगणकात बंदिस्त करून ठेवले.
* धर्मलेखा कडाडली - माझ्या लेकरास मी काहीही होऊ देणार नाही, हे वचन मी कधीच विसणार नाही.
* चिरंतनकडे धर्मलेखेची अनुज्ञा घेतल्यानंतरच प्रत्यक्षात येऊ शकणारी रूपविद्या होती.
*चिरंतनला पाहताच महामती अपराजितेच्या डोळ्यात उमटलेला अश्रू, महर्षी प्रमातांनी मन अत्यंत कठोर करून जागच्या जागीच दाबून टाकला होता....विजयरुद्रांनी महर्षी दांपत्याची व चिरंतन ची भेट घडवून आणली. त्या एक दळाच्या (min) भेटीने ते महर्षी दांपत्य तृप्त होऊन परतले.
* चिरंतनच्या बाणांना अधिक सामर्थ्य पुरवण्यासाठी चिरंतनच्या पाठीशी देवी यक्षेश्वरी उभी होती.
*52 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर सनातन धर्मियांनी आखलेल्या योजनेत 32 वर्षांपूर्वी सामील करून घेतला गेला व हा आजचा, ह्या लढाईतील धर्मलेखेच्या खालोखाल महत्वाचा शिलेदार आहे.
* सुमित्रा देवींचा जावई - चिरंतन ची पत्नी रसमाधुरीदेवी - ही सुमित्रा देवी व सात्विकविहंग यांची धर्मकन्या.
* चिरंतन पुत्र - चिदानंद ( 26 वर्षे) व कन्या क्षमा (21वर्षे)
* चिरंतन च्या डोळ्यातील तेज ब्रम्हर्षी गौतमांच्या डोळ्याप्रमाणे आहे. धर्मलेखे च्या डोळ्यात दिसते तशीच ह्यांच्या शांत डोळ्यात मधूनच एक वीज सळसळते.
* झांखिणीला चिरंतन हवाच होता.
* धर्मलेखेचा प्रमुख सेनापती
Compilation : Jayashriveera Panchbhai
मंथरा
मंथरा ३/९१
ह्या अग्रलेखातून आपण जिला समजून घेतले पाहिजे, असे पात्र म्हणजे ही मंथरा .
हिचे मूळ स्वरुप म्हणजे घृणातिशया.
पश्चात्तापानंतर, मंथरेला नीट समजून घेतल्यानंतर जिच्यासाठी, सर्व शुभ विद्येची दालनं उघडली गेली ती कैकयी सांगते.
ही मंथरा म्हणजे कपटविद्येने सर्वांना फसवणारी.
ही कधी कुबुद्धीच्या रुपात, तर कधी कुविद्येच्या रुपात सर्वत्र वावरत असते.आणि कुणाचाही घात करण्याचे सामर्थ्य तिच्याकडे असते.ही मानवाच्या अभक्तीतूनच निर्माण होते.
अर्थात् नास्तिकतेतून उत्पन्न होते.आणि माणसांच्या
अहंकारातून,क्रोधातून व लोभातून वाढत राहते.
लढणाऱ्या घृणातिशयेपेक्षाही ही कपटी मंथरा
जास्त खतरनाक आहे.म्हणून हिचा नाश आधी करावा लागतो.
रामरसायनात लक्ष्मण कपटी मंथरेचा मी नाश करेनच असंच म्हणतात.
मातृवात्सलविंदानं अध्याय २८
मध्ये एक वाक्य आहे,
सर्व प्रकारच्या शुक्राचार्यांना त्यांचे दुष्ट कार्य साध्य
करून घेण्यासाठी कपटाने नारदरुप घेऊनच वावरावे लागते.
१४ व्या अध्यायात
शुक्राचार्य दीतिला म्हणतात , शुंभ निशुंभांचे सुंदर व देखणे चेहरे, माझ्या कपटाने बनवलेला मुखवटा आहे.
कथामंजिरी ३/९०
जहिरावणाच्या रुपातील कंटका मनातल्या मनात म्हणते, हा थेरडा ॲकाराॅन क्षणात विचार करुन
कुठलेही कपट करु शकतो.ह्यालाच मदतीला घ्यावे.
असुरांना ही कपटी मंथराच हवी असते.
Varma Sharma Family Tree ( Maharshi Pavitranand Family Tree)
Revised on 11 Feb 2024 ( KM 3 - 91)
Varma Sharma Family Tree ( Maharshi Pavitranand Family Tree),Vishnuvarma,Varma Family Tree,Macaros,Indraditya,FAMILY TREE,Maheshaditya,Saraswati Devi,Bhagirathi Devi,Shivprasad Sharma,ARAKON,Harivarma,Makarsinh,Ram prasad Sharma,Ragini Devi,Iravati Devi