सद्विद्या नं ८७ ते९०
रसमाधुरीविद्या,इलाविद्या,इलाभंगविद्या वविजयमाधुरीविद्या
कथामंजिरी १४२
१) केशवादित्याला व रसमाधुरीदेवीला
इलादेवींनी रसमाधुरीविद्या शिकवली आहे.
२)विजयरुद्रांकडून रसमाधुरीदेवींनी तिच्या मातेवरील प्रेमासाठी इलाविद्या शिकून घेतली होती.
३) विजयरुद्रांनी ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांकडून धर्मलेखेसाठी इलाविद्या शिकून घेतली होती.
४)परंतु धर्मलेखेने इलाविद्येच्या विरुद्ध असणारी
अशी इलाभंगविद्या स्वतःच्या पातिव्रत्यानेच सिद्ध करून ठेवली होती.
५) त्यामुळे विजयरुद्र व रसमाधुरी इलाविद्येचाच
काय, तर इलाविद्येबरोबर रसमाधुरीविद्येचाही
वापर करू शकणार नव्हते.
६) परंतु केशवादित्य एकटाच असा आहे की,
जो इलाविद्या शिकून झाल्यानंतर,तिच्यातच
प्रयोग करून इलाभंगविद्या निष्प्रभ करणारी
विजयमाधुरीविद्या तयार करू शकेल.
७) कारण इलादेवींनी एकट्या केशवादित्याला शिवशासनम् ग्रंथातील शेवटचे प्रकरण शिकविले आहे.
८) आणि हे अन्वयेलाही ठाऊक नाही की,इलाभंगविद्येचा भंग करण्यासाठी लागणारे पवित्र सहाय्य ,शिवशासनम् ग्रंथामधील त्या शेवटच्या प्रकरणात आहे.
९) आता प्रश्न उभा राहिला आहे कारण
केशवादित्य रसमाधुरीविद्या व्यवस्थित जाणतो;
परंतु रसमाधुरीदेवींनी त्याला इलाविद्या शिकवली नाही.कारण त्या त्यासाठी तयार नाहीत.
१०) विजयरूद्र धर्मलेखेला शपथबद्ध असल्यामुळे,
केशवादित्याला इलाविद्या शिकवू शकत नाही.
११)इलाविद्या केशवादित्यास रसमाधुरीदेवी पण शिकवू शकत नाही व इलादेवीसुद्धा शिकवू शकत नाहीत कारण
अन्वयाच्या अनुभवावरून इलादेवी व रसमाधुरीदेवी एकमेकींच्या रूपात पाहिजे तेव्हा
वावरत असाव्यात.
१२) पण इलादेवींच्या रूपातील रसमाधुरीदेवी
केशवादित्याला इलाविद्या शिकवू शकतात.
असे अन्वयेला वाटते.
१३)म्हणून इलादेवींच्या रूपात, रंगेश्वरी गर्भगृहातून बाहेर आलेल्या रसमाधुरीदेवींकडून केशवादित्याने
**इलाविद्या* शिकून घेतली.
.१४) पण केशवादित्यास इलाभंगविद्येला निष्प्रभ
करणारी विजयमाधुरीविद्या तयार करावयाची होती.
व त्यासाठी त्याला धर्मलेखेची अशी गोष्ट हवी होती जिचा संबंध विजयरुद्रांशी असतो.
१५) केशवादित्यास विजयरुद्रांनी दोन वेळा
वृद्ध रूप घेऊन जाण्यास बजावले होते ते आठवताच त्यांच्या डोळ्यांसमोर धर्मलेखा उभी राहिली.आणि त्याला तिची स्वतःच्या हातातील मुद्रिका तिच्या नथीस लावून विजयरूद्रांचे स्मरण करण्याची सवय आठवली.
ही सवय धर्मलेखेच्या मायानगरीतील गुप्त कक्ष निष्प्रभ करतानाही केशवादित्याने पाहिली होती.
त्यानंतर त्याला आठवले की,इलादेवी
धर्मलेखेची मायानगरी बनल्या आहेत.
मग त्याला खात्री पटली की,नथ व मुद्रिका ह्यांच्या मध्येच इलाभंगविद्या असणार.
म्हणून तो व रसमाधुरीदेवी धर्मलेखेच्या आश्रमात गेले. तिथे धर्मलेखेच्या कपाटात त्यांना नथ व मुद्रिकेबरोबर त्या पेटीच्या तळावर इलाभंगविद्येचा
मंत्र धर्मलेखेच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेला दिसला.
१६) हे सर्व विजयरुद्रांना
सांगताच, त्यांना धर्मलेखेने प्रेमाने दिलेला वासुकी नागमणी आठवला.व तो त्यांनी आपल्या कंठकूपातून काढून केशवादित्याच्या मस्तकावरील केसात लपविला.
अशाप्रकारे केशवादित्यास इलाभंगविद्या निष्प्रभ करणारी विजयमाधुरीविद्या तयार करणे शक्य झाले.
No comments:
Post a Comment