Sunday 11 February 2024

मंथरा

 मंथरा ३/९१


ह्या अग्रलेखातून आपण जिला समजून घेतले पाहिजे, असे पात्र म्हणजे ही मंथरा .
हिचे मूळ स्वरुप म्हणजे घृणातिशया.

पश्चात्तापानंतर, मंथरेला नीट समजून घेतल्यानंतर जिच्यासाठी, सर्व शुभ विद्येची दालनं उघडली गेली ती कैकयी सांगते.

ही मंथरा म्हणजे कपटविद्येने सर्वांना फसवणारी.
ही कधी कुबुद्धीच्या रुपात, तर कधी कुविद्येच्या रुपात सर्वत्र वावरत असते.आणि कुणाचाही घात करण्याचे सामर्थ्य तिच्याकडे असते.ही मानवाच्या अभक्तीतूनच निर्माण होते.
अर्थात् नास्तिकतेतून उत्पन्न होते.आणि माणसांच्या
अहंकारातून,क्रोधातून व लोभातून वाढत राहते.

लढणाऱ्या घृणातिशयेपेक्षाही ही कपटी मंथरा
जास्त खतरनाक आहे.म्हणून हिचा नाश आधी करावा लागतो.
रामरसायनात लक्ष्मण कपटी मंथरेचा मी नाश करेनच असंच म्हणतात.

मातृवात्सलविंदानं अध्याय २८
मध्ये एक वाक्य आहे,
सर्व प्रकारच्या शुक्राचार्यांना त्यांचे दुष्ट कार्य साध्य
करून घेण्यासाठी कपटाने नारदरुप घेऊनच वावरावे लागते.

१४ व्या अध्यायात
शुक्राचार्य दीतिला म्हणतात , शुंभ निशुंभांचे सुंदर व देखणे चेहरे, माझ्या  कपटाने बनवलेला  मुखवटा आहे.

कथामंजिरी ३/९०
जहिरावणाच्या रुपातील कंटका मनातल्या मनात म्हणते, हा थेरडा ॲकाराॅन क्षणात विचार करुन
कुठलेही कपट करु शकतो.ह्यालाच मदतीला घ्यावे.

असुरांना ही कपटी मंथराच हवी असते.

संकलन - मोहिनीवीरा कुर्हेकर

No comments:

Post a Comment