Thursday 26 October 2023

शंभुनाथ यांचा तथाकथित मृत्यू आणि शोक : अन्वयाचे निरीक्षण आणि धर्मलेखा चे उत्तर .कथा मंजिरी 3-46 आणि 3-47

शंभुनाथ यांचा तथाकथित मृत्यू आणि शोक : अन्वयाचे निरीक्षण आणि धर्मलेखा चे उत्तर .

प्रश्न १) शालू बाईचे व सरोजिनीचे डोळे अगदी एकसारखे होते .


उत्तर : कारण सरोजिनी शालूबाईंची ( शालिनी देवींची) कन्या होती.

प्रश्न २) कोण कोणाला सांभाळते?

सुहास्यवदनादेवी सरोजिनीस अर्थात् शंभुनाथाच्या
पत्नीस सांभाळत आहेत की सरोजिनी सुहास्यवदनादेवीस सांभाळत आहेत?

उत्तर : सरोजिनी सुहास्यवदनादेवीस सांभाळत होती. कारण सरोजिनीचा पती शंभुनाथ जिवंत होता व  रामप्रसादांच्या रुपात तिथे उपस्थित होता.
कारण मृत देह रामप्रसाद शर्मांचा होता.व सुहास्यवदनादेवी रामप्रसादशर्मांची ( लक्ष्मणप्रसाद वर्मा) यांची कन्या होती.

आणि शिवप्रसाद शर्मा ( शिवप्रियादेवी) वत्सलादेवींना सांभाळत होते.कारण वत्सलेचा पिता गेलेला होता.व शिवप्रियादेवींचा सख्खा बंधू.

शिवप्रसाद शर्मा (भरत वर्मा) हे तीन वर्षांपूर्वीच
कुक्ष राजधानीत अल्पशा आजाराने निधन पावले होते.
ही गोष्ट गुप्त ठेवली होती.
शिवप्रियादेवींचे उघड वावरणे धोक्याचे झाले असते.
हे दोघे बहीण भाऊ एकसारखे दिसणारे होते.
शिवप्रियादेवींकडे ध्वनिविद्या असल्यामुळे
त्या कुणाही मनुष्याच्या आवाजात बोलू शकत होत्या.म्हणून शिवप्रियादेवींनी शिवप्रसाद शर्माचे
रूपं घेतले होते.

३)प्रश्न -शालूबाईंचे व भानुबाईंचे शोक त्यांच्या नात्यांच्या मानाने खूपच वेगळे होते.अतिम संस्काराच्या वेळेस मात्र शालूबाई शांत होत्या.

उत्तर: शालूबाई ही  शालिनीदेवी होती. सुजयादित्यांची द्वितीय पत्नी व विकटाची माता.
तिच्या मुलीचे सरोजिनीचे लग्न शंभुनाथांशी झाले होते. या नात्याने शंभुनाथ शालिनीदेवींचा जावई
होता.
त्यामुळे आधी तिला खरा शोक झाला होता.

पण धर्मलेखेने  मृत्यू रामप्रसाद शर्मांचा झाला आहे, हे सत्य सांगितल्यावर ती शांतपणे
कार्यात भाग घेऊ लागली.

भानुबाई तीर्थक्षेत्राला गेलेल्या आहेत असे सर्वांना
माहित असल्यामुळे गोदावरीदेवी भानुबाईचे रूप
घेऊन आल्या. कारण त्यांचे येणे आवश्यक होते.
कारण त्या मृत व्यक्तीबरोबर फार पूर्वीपासून कार्य करत होत्या.

त्यामुळे भानुबाईचा( गोदावरीदेवींचा) शोक वेगळा होता.

 संकलन : मोहिनीवीरा 


No comments:

Post a Comment