Sunday, 22 December 2024

व्रतपुष्प संख्या कैसे याद रखें ?

 How to remember the number of Vratpushpa we need to chant on specific day of Shree Vardhaman Vratadhiraj , suggested by our dearest Dad Sadguru Aniruddha Bapu in Shreemadpurusharth Grantgraj Khand 3 Anandsadhana ? Here is simple trick for year 2024 -2025 Vratadhiraj . Just for you.

Shree Vardhaman Vratadhiraj 2024- 2025


माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे. (Illustration : Sudeepsinh Kulkarni)

 माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे.

माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे.


Friday, 20 December 2024

स्वयंभगवानाच्या कृपेशिवाय माणूस अपूर्ण आहे ( Discussion Notes )

 🌻कथा मंजिरी ४/१/२४


भगवंताची कृपा म्हणजे काय? 

सत्यप्रवेश चरण २७ मध्ये बापूंनी हे सविस्तर सांगितलेले आहे.


त्यावरून माझ्या अल्पबुद्धीला जे बापू कृपेने आकळले ते असे आहे.

👇

त्याच्या सहाय्याशिवाय म्हणजेच त्याच्या

कृपेशिवाय माणूस अपूर्ण आहे.

माणसाचे बळही अपूर्ण आहे आणि यश ही अपूर्ण आहे.


माणूस अपूर्ण आहे, हे आपण अनुभवू शकतो.

अगदी प्रत्येक सत्कर्म करताना त्याच्या अधिष्ठानाने केलेले कर्म व त्याला न स्मरता केलेले कर्म ह्यांच्या

यशात  किती तफावत असते ते आपण रोजच्या दैनंदिन जीवनातसुद्धा अनुभवत असतो.परीक्षा देत असताना तर जास्तच अनुभव घेतलेला असतो.


त्याचे साहाय्य मिळणारच हा आधार

व तो माझा उद्धार करण्यास समर्थ‌ आहेच  हा आत्मविश्वास.हे दोन्ही त्या भक्ताकडे असणे म्हणजे

त्या भक्तावर त्याची कृपा असणे.


कारण भक्ताला त्याचा वाटणारा आधार व भक्ताचा आत्मविश्वास त्या स्वयंभगवानानेच दृढ केलेले असतात. स्वयंभगवानाची कृपा असल्यावरच त्या भक्ताला ह्या गोष्टी आकळतात.


पण ती कृपा त्या भक्ताला प्राप्त होण्यासाठी त्या भक्ताने उचित श्रम करून कर्म करत असताना

प्रेमाने त्या देवाधिदेवाला, त्या स्वयंभगवानाला ,

त्या पूर्णाला आठवले पाहिजे.व त्याच्या त्या क्रियेला समग्रत्व म्हणजे पूर्णत्व मिळावे अशी

त्याला प्रार्थना केली की त्या भक्ताला आधार म्हणजे साहाय्य मिळतेच व त्याचा स्वयंभगवानावरचा विश्वासही दृढ झालेला असतो त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढलेला असतो.


त्याला आठवणे म्हणजे  ते नामस्मरण असेल,भजन असेल,मन:पूर्वक पूजन असेल, गजर असेल .जे भक्ताला आवडेल ते पण त्यात प्रेमळ भाव पाहिजे.त्याची स्मृती ठेवणे म्हणजेच त्याला आठवणे .


हे त्याला प्रेमभावाने आठवणे, आपली गरज झाली पाहिजे. जशी लक्ष्मणरावांना झाली.

म्हणून लक्ष्मणराव म्हणाले, आपण सगळेजण देवघरात बसून शांतपणे गजर करु या.


श्रद्धावानांना म्हणजे आपल्याला आपल्या  देवाधिदेवाने बापूरायाने,एक शाश्वत ग्वाही दिलेली आहे व तो पुन्हा पुन्हा सांगत असतो,

मी तुला कधीच टाकणार नाही.

हाच श्रद्धावानांचा सर्वात मोठा आधार आहे असे मला वाटते.

माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे.


माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे.

तो सर्वसमर्थ आहे. हाच फक्त मला माझ्या पापांपासून मुक्ती देऊ शकतो, हा आत्मविश्वासही श्रद्धावानांकडे असतो.कारण त्याला वेळोवेळी मिळालेल्या त्यांच्या साहाय्यामुळे, त्याला मिळालेल्या अनुभवामुळे त्यांच्या विश्वासाचे रुपांतर आत्मविश्वासात झालेले असते.व त्यासाठीच कृपासिंधू मासिक वाचायचे असते.त्याने इतर श्रद्धावानांना दिलेले अनुभव वाचल्यावर आपल्यालाही हे साहाय्य मिळू शकते हा भाव हा विश्वास वाढायला लागतो.व त्याच्या संकटाच्या वेळी  तसेच साहाय्य त्याला मिळाल्यावर त्या विश्वासाचे रूपांतर आत्मविश्वासात झालेले असते.


म्हणजेच श्रद्धावानांकडे त्याची कृपा आहेच.

बापूंचा आधार व बापूंनी वाढवलेला आत्मविश्वास हीच श्रद्धावानावर त्याने केलेली  कृपा आहे.


माझा भगवंत पूर्ण आहे म्हणूनच  तो आधार देऊ शकतो व माझ्यात जे कमी आहे ते देण्यास तो एकमेव  समर्थ आहे हा श्रद्धावानांचा भाव असतो.

म्हणून ते जीवनात सफल होतात व त्यांचा बापू राया त्यांच्या जीवनाचा विकास घडवत असतो.


श्रद्धावानाने  त्याला एकच सांगायचे आहे की

देवाधिदेवा बापूराया,

तू माझ्या जीवनात माझा उद्धार करण्यासाठी जे काही ठरवले आहे  तसंच घडव .

त्याच्या आड मी जरी आलो तरी मला बाजूला सारून तुला हवं तसं तू मला घडव.


पूर्ण असलेल्या स्वयंभगवानाच्या कृपेशिवाय 

त्याची प्रत्येक क्रिया त्याचे बळ व त्यांचे यश अपूर्णच असते.

म्हणजेच मानवाने त्याचे प्रत्येक कर्म पूर्ण असलेल्या स्वयंभगवानाच्या  अधिष्ठानानेच केलं पाहिजे तरच ते यशस्वी होते.जसे काशीनाथराव व गोजीबाईंचे कुटुंब करतात.


सत्यप्रवेश पान १८२ -१८३ मध्ये बापू सांगतात की,

👇

मानवी मनाने स्वतःच्या कर्मस्वातंत्र्याने उत्पन्न केलेली दारूण महाशक्ती म्हणजेच माया.

परमेश्वरी स्मृतीचा अभाव म्हणजे माया.

माया हीच स्वतः 'अ-भावातून' उत्पन्न होत असल्यामुळे ती माझ्या जीवनात फक्त अभावच उत्पन्न करू शकते.आम्ही मानव मात्र ह्या अभावजन्य मायेच्या सहाय्याने पूर्णता उत्पन्न करु पाहतो.

..... ही एकमेव गोष्ट अशक्यच नाही कां?

अभावातून पूर्णता कधी येते कां?


ह्याचाच अर्थ आमच्या जीवनात पूर्णता आणण्यासाठी आम्हाला त्या अस्तित्व असणाऱ्या,म्हणजेच भाव रुपाने असणाऱ्या परमेश्वराच्या स्मृतीचीच (श्रद्धेची) आवश्यकता आहे.

#######################


श्रीसाईसच्चरित

 सदैव संपूर्ण साई हा । ५०/२१


म्हणूनच संपूर्ण असलेल्या परमात्मा बापूंना आठवून सर्व कर्मे केली की त्याचा आधार अनुभवता येतो व आपल्या विश्वासाचे रूपांतर आत्मविश्वासात होते म्हणजेच आपला परमात्मा बापू वरचा  विश्वास परमात्मा बापूच  दृढ करतो.


त्याला आठवणे, त्याची स्मृती ठेवणे, म्हणजेच उठाउठी मंत्रगजर करणे व ही  देणगीही त्यानेच आपल्या बाळांना, श्रद्धावानांना दिलेली आहे.

Notes from 

Aniruddha's Agralekh Discussion Group (Telegram)