Sunday 17 December 2023

झंखिणी JHANKHNI

 झंखिणी


कथामंजिरी ३/४९


केशवादित्याला झंखिणी नामक दुष्ट स्त्री पासून
धोका संभवतो.
ही झंखिणी रावणवंशातील नाही.
ही हडाम धूमकेतूच्या व दनुच्या संयोगातून
जन्मलेली आहे.
ही विजयरुद्रांची व धर्मलेखेची त्यांना माहित
नसलेली शत्रू आहे.
झंखिणीचे एकमेव ध्येय आहे,वसुंधरेवर ( ह्या पृथ्वीवर) अशुभ राज्य निर्माण करणे.

जेव्हा केशवादित्य धर्मयुद्धात लढत असेल,तेव्हा
ही झंखिणी त्याचा घात करण्याची संधी शोधत राहील.कारण तिच्या सर्व प्रकारच्या गुणांना
विरुद्ध असे गुण फक्त एका केशवादित्याकडेच
आहेत व मुख्य म्हणजे दनुच्या प्रत्येक शक्तीला
वारंवार नामोहरम करणारी शक्ती म्हणजेच रामभक्ती.व रामभक्तीचे मूळ स्वरूप अवंतिका आहे.

झंखिणीस तिच्या महागुरुंकडून सांगितले गेले आहे की, विजयरुद्र व धर्मलेखा ह्यांना झंखिणीचा धर्मगुरु स्वतः ठार करणार आहे.व त्यांच्या आड
केशवादित्य येऊ शकतो.आणि एकटी झंखिणीच
ह्या एकाच कार्यासाठीच -केशवादित्याला मारण्यासाठीच उत्पन्न केली गेलेली आहे.व तिचा मृत्यू अवंतिका आहे.

कथामंजिरी ३/६९

झंखिणी ही केवळ दनुची कन्या नसून जणू
प्रतिदनुच आहे.

मकरसिंह कंटकेचा देह तपासत होता तो देह
झंखिणीचा होता.कंटकाचा नव्हता.
जिला धर्मलेखेने स्वत: जेरबंद करून त्यांच्या ताब्यात दिला होता.

झंखिणीचा हा देह सांभाळणे व त्यांचे नीट जतन करणे ही कामगिरी फक्त सुवर्चलादेवी व मकरसिंह
करू शकतात.कारण ही झंखिणी गर्भवती आहे.
व हिच्या अपत्याचा पिता हा मकरसिंह व सुवर्चलादेवी ह्यांचा पिता सम्राट ॲकाराॅन आहे.त्यामुळे हिच्या गर्भातील अपत्य व त्यांची जनुके (genes) ही फक्त त्या दोघांशी मिळती-
जुळती असणारी आहेत.

झंखिणीला विजयरूद हवे आहेत ते भोगण्यासाठी व उपयोगासाठी.

झंखिणीच्या कन्येचा  जन्म  झाल्यास ती फार मोठी धोकादायक घटना असेल.तिच्या गर्भातील अपत्याचा गर्भपात होऊच शकत नाही.कारण झंखिणीच्या गर्भाचे संरक्षण करण्यासाठी सरस्वती देवींच्या पतीने,तिनेच तोडून फेकलेल्या तिच्या मंगळसूत्राचा उपयोग केलेला आहे.

झंखिणी जहिरावणालाही  हवी आहे.

संकलन : Mohiniveera Kurhekar

No comments:

Post a Comment