Sunday 17 December 2023

अनुनाकीय

 

अनुनाकीय
इदं न मम ! इदं अनिरुद्धस्य!

वसुंधरेवर मानवी जीवन प्रजापतिब्रह्माने निर्माण
केल्यानंतर ह्या पृथ्वीवरील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्येसुद्धा मानववंशाची प्रगती होऊ लागली.व त्या सत्ययुगाच्या....पहिल्या पन्नास हजार वर्षांनंतर....मानवाची स्थूल ज्ञानाच्या सहाय्याने
विज्ञानामध्ये प्रचंड प्रगती झाली आणि ह्या प्रगतीमध्ये मानवास दूरध्वनीसंपर्क, आकाशगमन,
दूरप्रागट्य  ( टेलिपोर्टेशन)असे विविध तंत्रज्ञान विज्ञानाच्या सहाय्याने प्राप्त झाले.

पृथ्वीवरील इतर प्रदेशांतील श्रद्धाहीन  मानव,विज्ञानाच्या प्रगतीमुळे आदिमाता ही केवळ वैश्विक ऊर्जा आहे व तिला आम्ही वापरु शकतो,अशा मूर्खविचारांमुळे सत्वगुणांपासून
ढळू लागला.त्यांनी इतर ग्रहावरील अर्थात
इतर पृथ्वींवरील मानवावर ही विजय मिळवला.
त्यांनी त्यांचे साम्राज्य संपूर्ण आकाशगंगेमध्ये स्थापन करण्याचे ठरवले.व त्या दृष्टीने त्यांनी अत्यंत विशाल,बलाढ्य व शस्त्र सज्ज अशी अवकाशयाने
बनविली व इतर पृथ्वीवर आक्रमणे करण्यास
सुरुवात केली.

'वसुंधरा' ही आध्यात्मिदृष्ट्या विश्वारचनेतील
सर्वोच्च पृथ्वी असल्याचे त्यांना ज्ञात झाले होते.
इतर पृथ्वीवरील मानव त्यांना क्षुद्र दर्जाचे वाटू लागले होते.

मात्र स्थूल विज्ञानाच्या प्रगतीमुळे असंख्य सुविधा
प्राप्त होऊनही आदिमातेवरील निस्सीम भक्तीमुळे
ह्या भारतवर्षातील श्रद्धावान मानवसमाज मात्र जरासुद्धा सत्वगुणांपासून ढळला नाही.

अशा भरकटलेल्या मानवांची वृत्ती पाहून सर्व
जगभरातील ब्रह्मर्षि एकत्र झाले व त्यांनी देवर्षि
नारद व प्रजापतिब्रह्मास साह्य करणाऱ्या ब्रह्मर्षि
कश्यपांची भेट घेतली.

देवर्षि नारदांनी अत्रि-अनसूयेशी सल्लामसलत
करून सर्व ब्रह्मर्षिस व त्यांच्या प्रमुख शिष्यांस
एकत्र केले.व जगभरातील श्रद्धावानास विविध प्रदेशांतून हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील
भागात अर्थात वैदिक भूमीत आणून बसविण्याचे
कार्य सोपविले.

अशा रितीने सर्व  श्रद्धावान भारतभूमीत येऊन
स्थिर झाले.व त्यांच्याइतकेच असणारे श्रद्धाहीन
मानव पृथ्वीच्या इतर खंडामध्ये राहिले.

त्या श्रद्धाहीनामधील राजे सेनापती व प्रगल्भ शास्त्रज्ञ ह्यांनी त्यांचा एक वेगळाच संप्रदाय निर्माण केला.ज्यास अनुनाकीय असे नाव दिले गेले.व
त्यांच्या संघाबाहेरील इतर श्रद्धाहीनास अनुनाकीय
आपले गुलाम समजू लागले.

पन्नास हजार वर्षांमध्ये वसुंधरेवर मानवाचे सरासरी
आयुष्य साडेचारशे वर्षांपेक्षाही अधिक होते.

निंबुरा पृथ्वीवर तर तेथील जैविक विज्ञान प्रगतीमुळे **तेथील मानवांचे आयुष्य कमीतकमी नऊशे
वर्षे होते.**
व जातीत जास्त सोळाशे वर्षे होते.

संकलन : 
Mohiniveera Kurhekar:

No comments:

Post a Comment