Tuesday, 26 December 2023

Wednesday, 20 December 2023

Sunday, 17 December 2023

अनुनाकीय

 

अनुनाकीय
इदं न मम ! इदं अनिरुद्धस्य!

वसुंधरेवर मानवी जीवन प्रजापतिब्रह्माने निर्माण
केल्यानंतर ह्या पृथ्वीवरील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्येसुद्धा मानववंशाची प्रगती होऊ लागली.व त्या सत्ययुगाच्या....पहिल्या पन्नास हजार वर्षांनंतर....मानवाची स्थूल ज्ञानाच्या सहाय्याने
विज्ञानामध्ये प्रचंड प्रगती झाली आणि ह्या प्रगतीमध्ये मानवास दूरध्वनीसंपर्क, आकाशगमन,
दूरप्रागट्य  ( टेलिपोर्टेशन)असे विविध तंत्रज्ञान विज्ञानाच्या सहाय्याने प्राप्त झाले.

पृथ्वीवरील इतर प्रदेशांतील श्रद्धाहीन  मानव,विज्ञानाच्या प्रगतीमुळे आदिमाता ही केवळ वैश्विक ऊर्जा आहे व तिला आम्ही वापरु शकतो,अशा मूर्खविचारांमुळे सत्वगुणांपासून
ढळू लागला.त्यांनी इतर ग्रहावरील अर्थात
इतर पृथ्वींवरील मानवावर ही विजय मिळवला.
त्यांनी त्यांचे साम्राज्य संपूर्ण आकाशगंगेमध्ये स्थापन करण्याचे ठरवले.व त्या दृष्टीने त्यांनी अत्यंत विशाल,बलाढ्य व शस्त्र सज्ज अशी अवकाशयाने
बनविली व इतर पृथ्वीवर आक्रमणे करण्यास
सुरुवात केली.

'वसुंधरा' ही आध्यात्मिदृष्ट्या विश्वारचनेतील
सर्वोच्च पृथ्वी असल्याचे त्यांना ज्ञात झाले होते.
इतर पृथ्वीवरील मानव त्यांना क्षुद्र दर्जाचे वाटू लागले होते.

मात्र स्थूल विज्ञानाच्या प्रगतीमुळे असंख्य सुविधा
प्राप्त होऊनही आदिमातेवरील निस्सीम भक्तीमुळे
ह्या भारतवर्षातील श्रद्धावान मानवसमाज मात्र जरासुद्धा सत्वगुणांपासून ढळला नाही.

अशा भरकटलेल्या मानवांची वृत्ती पाहून सर्व
जगभरातील ब्रह्मर्षि एकत्र झाले व त्यांनी देवर्षि
नारद व प्रजापतिब्रह्मास साह्य करणाऱ्या ब्रह्मर्षि
कश्यपांची भेट घेतली.

देवर्षि नारदांनी अत्रि-अनसूयेशी सल्लामसलत
करून सर्व ब्रह्मर्षिस व त्यांच्या प्रमुख शिष्यांस
एकत्र केले.व जगभरातील श्रद्धावानास विविध प्रदेशांतून हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील
भागात अर्थात वैदिक भूमीत आणून बसविण्याचे
कार्य सोपविले.

अशा रितीने सर्व  श्रद्धावान भारतभूमीत येऊन
स्थिर झाले.व त्यांच्याइतकेच असणारे श्रद्धाहीन
मानव पृथ्वीच्या इतर खंडामध्ये राहिले.

त्या श्रद्धाहीनामधील राजे सेनापती व प्रगल्भ शास्त्रज्ञ ह्यांनी त्यांचा एक वेगळाच संप्रदाय निर्माण केला.ज्यास अनुनाकीय असे नाव दिले गेले.व
त्यांच्या संघाबाहेरील इतर श्रद्धाहीनास अनुनाकीय
आपले गुलाम समजू लागले.

पन्नास हजार वर्षांमध्ये वसुंधरेवर मानवाचे सरासरी
आयुष्य साडेचारशे वर्षांपेक्षाही अधिक होते.

निंबुरा पृथ्वीवर तर तेथील जैविक विज्ञान प्रगतीमुळे **तेथील मानवांचे आयुष्य कमीतकमी नऊशे
वर्षे होते.**
व जातीत जास्त सोळाशे वर्षे होते.

संकलन : 
Mohiniveera Kurhekar:

झंखिणी JHANKHNI

 झंखिणी


कथामंजिरी ३/४९


केशवादित्याला झंखिणी नामक दुष्ट स्त्री पासून
धोका संभवतो.
ही झंखिणी रावणवंशातील नाही.
ही हडाम धूमकेतूच्या व दनुच्या संयोगातून
जन्मलेली आहे.
ही विजयरुद्रांची व धर्मलेखेची त्यांना माहित
नसलेली शत्रू आहे.
झंखिणीचे एकमेव ध्येय आहे,वसुंधरेवर ( ह्या पृथ्वीवर) अशुभ राज्य निर्माण करणे.

जेव्हा केशवादित्य धर्मयुद्धात लढत असेल,तेव्हा
ही झंखिणी त्याचा घात करण्याची संधी शोधत राहील.कारण तिच्या सर्व प्रकारच्या गुणांना
विरुद्ध असे गुण फक्त एका केशवादित्याकडेच
आहेत व मुख्य म्हणजे दनुच्या प्रत्येक शक्तीला
वारंवार नामोहरम करणारी शक्ती म्हणजेच रामभक्ती.व रामभक्तीचे मूळ स्वरूप अवंतिका आहे.

झंखिणीस तिच्या महागुरुंकडून सांगितले गेले आहे की, विजयरुद्र व धर्मलेखा ह्यांना झंखिणीचा धर्मगुरु स्वतः ठार करणार आहे.व त्यांच्या आड
केशवादित्य येऊ शकतो.आणि एकटी झंखिणीच
ह्या एकाच कार्यासाठीच -केशवादित्याला मारण्यासाठीच उत्पन्न केली गेलेली आहे.व तिचा मृत्यू अवंतिका आहे.

कथामंजिरी ३/६९

झंखिणी ही केवळ दनुची कन्या नसून जणू
प्रतिदनुच आहे.

मकरसिंह कंटकेचा देह तपासत होता तो देह
झंखिणीचा होता.कंटकाचा नव्हता.
जिला धर्मलेखेने स्वत: जेरबंद करून त्यांच्या ताब्यात दिला होता.

झंखिणीचा हा देह सांभाळणे व त्यांचे नीट जतन करणे ही कामगिरी फक्त सुवर्चलादेवी व मकरसिंह
करू शकतात.कारण ही झंखिणी गर्भवती आहे.
व हिच्या अपत्याचा पिता हा मकरसिंह व सुवर्चलादेवी ह्यांचा पिता सम्राट ॲकाराॅन आहे.त्यामुळे हिच्या गर्भातील अपत्य व त्यांची जनुके (genes) ही फक्त त्या दोघांशी मिळती-
जुळती असणारी आहेत.

झंखिणीला विजयरूद हवे आहेत ते भोगण्यासाठी व उपयोगासाठी.

झंखिणीच्या कन्येचा  जन्म  झाल्यास ती फार मोठी धोकादायक घटना असेल.तिच्या गर्भातील अपत्याचा गर्भपात होऊच शकत नाही.कारण झंखिणीच्या गर्भाचे संरक्षण करण्यासाठी सरस्वती देवींच्या पतीने,तिनेच तोडून फेकलेल्या तिच्या मंगळसूत्राचा उपयोग केलेला आहे.

झंखिणी जहिरावणालाही  हवी आहे.

संकलन : Mohiniveera Kurhekar

Thursday, 14 December 2023

Mangalacharan Vratapushpa For Vardhaman Vratadhiraj (Printable)

 

Mangalacharan Vratapushpa For Vardhaman Vratadhiraj (Printable)
Hari Om 

Credits for this information : Notice regarding Vratapushpa for Vardhaman Vratadhiraj - 2023

https://sadguruaniruddhabapu.com/post/notice-regarding-vratapushpa-for-vardhaman-vratadhiraj-2023

Click Here to read the complete article.


Sunday, 10 December 2023

दशावतार आरती : आरती सप्रेम जय जय विठ्ठल

 आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।

भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥


अंबऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।

वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।

मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।

हस्त तुझा लागतां शंखासुरा वर देसी ॥ १ ॥


रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।

परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥

दाढें धरुनी पृथ्वी नेता वराह रुप होसी ।

प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥


पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।

भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥

सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।

वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥


सहस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।

कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥

नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।

सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥


मातला रावण सर्वा उपद्रव केला ।

तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥

पितृवचना लागीं रामें वनवास केला ।

मिळोनी वानर सेना राजाराम प्रगटला ॥ ५ ॥


देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें ।

नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥

गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।

गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥


बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा ।

सोडूनी दिधला धर्म म्हणुनी ना दिससी देवा ॥

म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा ।

बहिरवि जान्हवि द्यावी निजसुखाआनंद सेवा ॥ ७ ॥


--


Saturday, 9 December 2023

तारिणीविद्या

 तारिणीविद्या

तुलसीपत्र १३२०

श्रीचण्डिकाकुलाशी सर्व अहंकार सोडून फक्त
भाबड्या भक्तिभावाने आचरण करणे व मन
श्रीचण्डिकाकुलाविषयी निर्विकल्प करणे-
ही एकच गोष्ट अगदी सामान्यातल्या सामान्य मानवापासून महर्षिपर्यंत प्रत्येकाने आपापल्या
कुवतीनुसार करणे,

ही एकमेव तारकशक्ती आहे, तारिणीविद्या आहे अर्थात् पश्यंतीवाणी आहे.

तारिणीविद्या म्हणजे,
स्वतःच स्वतःला श्रीचण्डिकाकुलाचा नि:संशय
व अविभाज्य घटक मानणे.

कोण म्हणून?

तुमचा इष्टदेवताचा पुत्र म्हणून किंवा कन्या म्हणून,
तसेच एकमेव अद्वितीय असणाऱ्या त्रिविक्रमाला
एका स्तरावर 'पिता'
दुसऱ्या स्तरावर 'मित्र' व
तिसऱ्या स्तरावर ' आपले अंतिम साध्य व ध्येय' मानणे.

Wednesday, 6 December 2023

Kathamanjiri 3-64 QUIZ

Idea of ancient names of places

गोरक्षनाथ परिसर

नेपाळमधील मोठा भाग व त्यालगतचा

चीनचा भाग.३/५१

पारसिक साम्राज्य ( इराण व इराक) KM 3 -64

कंटका (पारसिक राजकुमारी)

सम्राट अँब्बमान  - (अभिमान) 

सम्राज्ञी तरीषणा ( तृष्णा)

उग्रवन - Ukraine 

उग्र वंशीय - Ukrainian 

समुद्री राक्षस (Dragon)हा धर्मलेखा च्या मायानगरी चा घटक होता । (km 3-36)

शासक पक्षी : Kung Fu Secretary Bird

शासलिक साम्राज्याची राजधानी : भयजंगा (बिजिंग) km3-35

2 योजने : 26 किलोमीटर ( Km3-34)

ऋषियान : रशिया (km 3-33)

मॅकॅरॉस : मकर

 हरिहर नगरी : कुक्ष सामराज्याची राजधानी 

50,000 ft above sea level ( पट्टfeet)

On first mountain of Himalaya.

काष्ठमंडप : काठमांडू Kathmandu

त्रिविष्ट : तिबेट Tibet

जुनी नावे नवीन नावे


१)कुश (सुदान)

२) हाबेशा ( इथिओपिया)

३) कलफुराय(कॅलिफोर्निया)

४) कनाटा ( कॅनडा)

५) एडाॅम (जाॅर्डन)

६) इशिपट्ट (इजिप्त)

७)इरान्वत ( इराण)

८) माक्षिक (मेक्सिको)

९)अंबरिका ( अमेरिका)

१०)बाॅई ( बोहेमिया)

११)पर्णमान (पनामा)

१२) चिलिका ( चिली)

१३) आल्बिऑन (ब्रिटन)

१४) श्येन (चीन)

१५) नयपाल (नेपाळ)

१६) ऑलमेक (ब्राझील)

१७) अमरजा (अमेझॉन)

१८) वा ( जपान)

१९) कंबुज (कंबोडिया)

२०) इरावाक (इराक)

२१) शर्मण्य ( जर्मनी)

२२) मेसोपोटेमिया (इराक मधील भाग)

२३) बॅबिलॉन ( बगदाद जवळचा भाग)

२४) हेंडिया (भारतवर्ष - ग्रीक नागरिक बोलायचे)

२५) मोंटे ऑलिंपस - (ग्रीस मधील पर्वत रांग)

२६) उरुक - (इराक मधील वारका शहर)

२७) अपारिका ( आफ्रिका)

२४) बारमोंडा ( बर्मुडा)

२५) अल्बिऑन (ब्रिटन)

२६) व्हाॅल्टशुका ( Waltshire)

२७) गांधार (अफगाणिस्तान)

२८) आर्यस्थान.  (Ireland)

२९) बनगाझी ( Libya)

३०) ऐनल्या ( इटली)

३१) शर्मण्य ( जर्मनी)

३२) टार्टारस ( तुर्कस्तान)

३३) अर्वस्तान ( अरबस्तान)

३४) लानदानस ( लंडन)


ही नावे अग्रलेखातून घेतली आहेत. 

Notes compilation by Mohiniveera Kurhekar


credits : Daily Newspaper Pratyaksha 
Agralekh Tulsipatra written by Dr. Aniruddha Joshi (  Sadguru Aniruddha Bapu )


To read the articles please subscribe Tulsipatra.in Click here



Tuesday, 5 December 2023