🌻शुभात्रेयी🌻
कथामंजिरी ३/११७ व तुलसीपत्र १४९८
ह्या अग्रलेखात ब्रह्मवादिनी शुभात्रेयींचा उल्लेख आला आहे.
याज्ञवल्क्य सांगतात,मंत्रगजर चोरणे म्हणजे
दत्तात्रेयभगिनी शुभात्रेयीदेवींच्या पादुका चोरणे.
ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे भगवान अत्रि व भगवती अनसूया ह्यांची कनिष्ठ कन्या अर्थात् भगवान दत्तात्रेयांची सख्खी धाकटी बहीण.
ही दत्तात्रेय भगिनी सदैव माता-पित्याबरोबर राहून त्यांची सेवा करीत असते.व हिलाच स्वतः अनसूयेने त्रिविक्रमाची उपासना देण्याची प्रथम दीक्षा
सत्ययुगातच दिलेली आहे- जेव्हा वेद लिहिले जात होते.भगवान त्रिविक्रमाच्या भक्तांची काळजी घेणे
हाच तिचा निर्धार आहे.
हिचा त्रिविक्रम कसा आहे हे तिच्याच शब्दांत,
⬇️
ज्याच्या मस्तकी राहती श्रीदत्त।
जगदंबा करी निवास ज्याच्या हृदयचित्तात
हनुमंत स्वतः आहे ज्याचे हस्त
असा असे हा एकमेव अद्वितीय त्रिविक्रम दत्त प्रदत्त।
ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे त्रिविक्रमाची माता
श्रीविद्या हिचे मानवी स्वरूप आणि म्हणून
शुभात्रेयी ही त्रिविक्रमाची माताच.
हिने मंत्रगजर सर्व श्रद्धावानांसाठी खुला केला.
ह्या दत्तात्रेय भगिनीस अर्थातच मृत्यूचे बंधन नाही.
काळाचे बंधन नाही.
परंतु तिने स्वतःचे सर्व तपोबळ तिच्या पादुकामध्ये ठेवून दिले आहे.
केवळ एकाच गोष्टीसाठी - श्रद्धावानाकडे पुण्य जराही नसले,तरीदेखील त्याला मंत्रगजर करता यावा म्हणून.
ह्या तिच्या पादुका हिमालयातील एका गुप्त स्थानावर सुरक्षित ठेवल्या गेल्या आहेत.कारण त्रिगुणात्मक त्रैमूर्ति भगवान दत्तात्रेयांच्या रचनेनुसार
जोपर्यंत ह्या पादुका अशुद्ध जलात विसर्जित होणार नाहीत,तोपर्यंत हा महामंत्र, हा मंत्रगजर
श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ बलस्थान असेल व ते
बलस्थानच ह्या दुष्ट परंपरेला चोरावयाचे आहे.