भारतमातेच्या सेवेचे विविध मार्ग । कथामंजिरी 4- 3-35 । MadArt_369 Illustration
देशकार्यात सहभागी झालेला क्रांतीकारक किती मुत्सद्दी आणि मुरब्बी असतो हे ह्या अग्रलेखातून दिसून येते.
🙏🙏🙏 : MadArt_369
🙏🙏🙏 : MadArt_369
जालियनवाला बाग घटनेनंतर चे पडसाद । कथामंजिरी 4- 3-34
कथामंजिरी 4-3-34
'जालियनवाला बाग' मध्ये घडलेल्या अमानुष आणि क्रूर घटनेनंतर काय काय घडलं हे प्रत्येक भारतीयाला माहीत असणे किती गरजेचे आहे हे आजच्या अग्रलेखातून जाणवतेय.
आपल्याला दाखविलेला इतिहास आणि प्रत्यक्षात घडलेला इतिहास कसा होता, समज की गैरसमज.. . हे प्रत्यक्षपणे दाखविणारा आपला खराखुरा मित्र दै. "प्रत्यक्ष"
🙏🙏🙏
भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी संपूर्ण जीवन वाहून घेतलेल्या श्रद्धावानाला अभय देणारा आणि पुढील मार्ग दाखविणारा देवीवाहन व्याघ्र आजच्या अग्रलेखात जरूर पाहावा. MadArt_369
मल्हाररावांनी निवडलेला मार्ग... त्यांची दूरदृष्टी आणि त्यानुसार उचललेली पाऊले हे सर्व अग्रलेखातून वाचताना खरोखरच एकनिष्ठ देशभक्त कसा असतो हे दिसून येते..
शुभं करोति कल्याणमारोग्यं सुखसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।।
दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः । दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।।
What this Mantra means:
First Verse: "I salute the light of the lamp which brings auspiciousness (Shubham), prosperity (Kalyanam), good health (Aarogyam), and abundance of wealth. I salute the light that destroys the intellect of enemies (negative thoughts and ignorance)."
Second Verse: "The light of the lamp is the Supreme Brahman (the ultimate reality) and the light is Janardana (Lord Vishnu/Ram). May this light destroy my sins. I salute the light of the lamp."
Symbolism in your Image
In the context of your vision of Lord Ram:
The Bluish-Purple Marble represents the infinite, sky-like nature of the Divine.
The Single Diya represents the soul's yearning for knowledge and the removal of darkness.
The Shadows signify the worldly illusions that fade away in the presence of Ram’s aura.
आपल्या भारतभूमीला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या क्रांतिकारकाना किती यातना भोगाव्या लागल्या आणि तरीही त्यांचा ठाम निर्धार... हे सर्व वाचताना अंगावर शहारा आल्यावाचून राहत नाही...
आत्तापर्यंत दडवलेला हा इतिहास दै. प्रत्यक्ष उलगडतोय. आत्तातरी तो जाणून घ्यायलाच हवा..
वंदे मातरम!
*भारतातील असंतोषाचे एकमेव जनक...*
🔹करारी चेहरा...
🔹खणखणीत आवाज...गेले काही दिवस अग्रलेखातून सुरु असलेले राणी लक्ष्मीबाई आणि तिच्या जीवाश्च कंठश्च साथीदारांनी केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाचे पवित्र स्मरण आणि हादरवून सोडणारे स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य प्रत्येक देशभक्ताला नतमस्तक व्हायला भाग पाडते....
आजचा अग्रलेख म्हणजे जीवाला जीव लावणारा "जीवश्च-कंठश्च" आप्त/मित्र कसा असतो याची परिभाषा समजावणारा आहे.
.. अग्रलेख.... वाचता वाचता जसजसा शेवट जवळ येतो... नकळत भावूक करून डोळ्याच्या कडा ओला करून जातो.. कोणीतरी आपलं स्वतःचं जीवश्चकंठश्च ह्या अग्रलेखाद्वारे इतिहासाच्या दडवलेल्या पानातून बाहेर येऊ पाहतंय आणि आपल्याशी हितगुज करण्यास उत्सुक आहे असं वाटतंय.
राणी लक्ष्मीबाईच्या शेवटच्या क्षणांची आठवण काढत व हृदयात असीम धैर्य व शौर्य उत्पन्न करीत ह्या चौघांनी गद्दार व फितूरांना यमसदनी पाठवूनच आपला देह त्यागला.
असे लढवय्ये होते म्हणूनच स्वातंत्र्ययुद्धाची ज्योत पेटत राहिली.
अशा ह्या भारतमातेच्या शूरवीर पुत्रांना मानाचा मुजरा!
🙏🙏🙏
खऱ्या अर्थाने राणी लक्ष्मीबाई आणि तीचे कार्य जाणून घ्यायचे असेल तर आपला दै. 'प्रत्यक्ष' वाचायलाचा हवा. मृत्यूपूर्वीच अशी काही माणसे जोडून ठेवली होती की त्यांचे कार्य वाचून राणी लक्ष्मीबाईचे महात्म्य आपल्यासमोर नव्याने उलगडतंय असं वाटतंय...
खरंच इतिहासाची ही पाने दै. 'प्रत्यक्ष'मधून चाळताना खूप काही दडलेल्या थोडक्यात परंतु महत्त्वाच्या गोष्टी समजतायेत.
: MadArt_369
राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतरचा इतिहास कुठल्या पाठयपुस्तकात दिलाय मला माहित नाही... परंतु दै. प्रत्यक्ष ही माहिती आणि जाणीव करून देतोय स्वातंत्र्यलढा कसा लढला गेला... राणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 'दुर्गादल" आणि "महादेवशिवदल" कसे सज्ज झाले आणि कोणत्या परिस्थितीत... हे आजच्या अग्रलेखातून वाचावयास मिळतेय.
केवळ देव... देश आणि धर्मासाठी...
स्वतःच्या अंतिम संस्कारांची तयारी करूनच दोघांनीही मृत्यूला मिठी घातली...
हे वाक्य वाचून अंगावर शहारा येतो.. खरंच धन्य तो पिता आणि अतिधन्य त्याची कन्या राणी लक्ष्मीबाई... 🙏🙏🙏
अशा वीर पिता-कन्येचा घात करणाऱ्या फितूरांचा आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा वध झाल्याशिवाय या वीरांना पुष्पांजली वाहिली जाऊ शकत नाही...
जय राणी लक्ष्मीबाई!
जय भारतमाता!
🙏🙏🙏
निःशब्द आणि सुन्न करणारा अग्रलेख 🙏🙏🙏
राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू कधी होऊच शकत नाही...
ती आजही भारतमातेच्या हृदयात आहेच आहे
आणि सदैव असणारच आहे.
🙏🙏🙏
राणी लक्ष्मीबाईला भावपूर्ण वंदन.
🙏🙏🙏
मरतेवेळी कोणतीही व्यक्ती सत्यच बोलते परंतु आपल्या राणीला वाचविण्यासाठी धादान्त असत्य बोलणाऱ्या झालकारीबाईचे शौर्य आणि बलिदान पाहून मन हेलावल्याशिवाय राहत नाही..
प्रिय व्यक्तींचे बलिदान... प्रजेचे हाल... राज्याचे नुकसान होत होते... अंगावर 59 खोल जखमा... तरीही "ती" माघार घेत नव्हती...
"मेरी झांसी नही दूंगी" हे फक्त बोलण्यापुरते शब्द नव्हते तर... .... ...
*..."ती"ने जिद्द सोडली नाही.*
राणी लक्ष्मीबाई, वय वर्ष फक्त 20 असावं.. परंतु पराक्रम मात्र गगणाला भिडणारा...
अग्रलेख वाचतोय की इतिहासाच्या पुस्तकाची हरवलेली पाने वाचतोय असं वाटतंय.. हा इतिहास शालेय पाठयपुस्तकात असायलाच हवा... नाही कां?
🙏🙏🙏
*"कधी ना कधी मरायचे तर प्रत्येकाला आहे....*
*... ... मग मरायचेच तर.... ... ..."*
भारावून टाकणारे आणि जोशपूर्ण असे राणी लक्ष्मीबाईचे तेजस्वी वाणीने व विचारांनी भरलेले भाषण आजच्या अग्रलेखात वाचल्यावर आपल्या ह्या देशाचा इतिहास गौरवशाली कां आहे ह्याची साक्ष पटते.
देश आणि धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचा प्राण जाणार हे माहित असतानाही पुढील काळातील प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणादायक भाषण देणाऱ्या राणी लक्ष्मीबाईला कोटी कोटी प्रणाम!
🙏
19-10-2025
------------------
*कथा 3-11*
------------------
1857....
लॉर्ड डलहौशी ने दत्तकविधानासंदर्भात आज्ञापत्र काढल्यावर त्याच रात्री झाशीमध्ये काय घडले....
आणि...
1858.....
राणी लक्ष्मीबाईच्या 'दुर्गादला'तील वी्रांगणांचा पराक्रम जाणून घेण्यासाठी आजचा अग्रलेख वाचायलाच हवा...
नाही कां? 😊
🙏
16-10-2025
-
-----------------
*कथा 3-10*
------------------
संपूर्ण राजवैभव नशिबी होतं तरी विविध व्याधिंनी पीडलेला नवरा व अल्पायुषी ठरलेला पुत्र अशा दुःखातून बाहेर पडताना ब्रिटिशांमुळे होणारे राज्याच्या नागरिकांचे हाल मात्र राणी लक्ष्मीबाईला पाहवत नव्हते. आणि त्यासाठी तिने... ... ... ....
अशा ह्या धुरंधर मनकर्णिकेची चित्तथरारक गाथा दै. "प्रत्यक्ष"च्या अग्रलेखांतून वाचायला मिळतेय..
अंबज्ञ् बापू...
नाथसंविध्
🙏
Image and text credits : Instagram and facebook AniruddhaBapu Devotee - Samirsinh .
।। श्री धन्वन्तरि मंत्र ।।
ॐ आदिवैद्याय विद्महे आरोग्य-अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरि: प्रचोदयात्।
ॐ नमो भगवते महासुदर्शन वासुदेवाय, धनवन्तरये अमृत-कलश हस्ताय , सर्वभयविनाशाय, सर्वरोगनिवारणाय,
त्रिलोकपथाय, त्रिलोकनिधाय, श्रीमहाविष्णुस्वरूप, श्रीधन्वन्तरिस्वरूप, श्री श्री श्री वौषट् चक्र नारायणाय स्वाहा।
ॐ आदिवैद्याय विद्महे आरोग्य-अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरि: प्रचोदयात्।
*मंगल दिवाकर पांडे*
आणि र
*ईश्वरीप्रसाद*
ह्यांच्या नामोच्चाराशिवाय स्वातंत्र्यसंग्रामाची गाथा सुरु होऊ शकत नाही
🙏🙏🙏
📰
*"आपल्या कार्यासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढेच सांगणार"*...
👆
...असे म्हणत काय म्हणून नाही आजच्या अग्रलेखातून सांगितलंय...
* आपल्या मातृभूमीचा गौरवशाली इतिहास...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* साध्यासुध्या माणसांनी सुद्धा स्वातंत्र्यलढ्यात आपल्या जबाबदाऱ्या कशा निभावल्या...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* ब्रिटिशांनी भारतीय नागरिकांमध्ये कोणता गैरसमज पसरविला होता...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* राणीचे राज्य येण्याआधी ब्रिटिशांनी भारतात सुरु केलेल्या रेल्वे.. पोस्ट.. इत्यादी सुखसुविधांमागे काय गुप्त हेतू होता....
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* भारतातील नैसर्गिक संपत्तीची लूट ब्रिटिशांनी कशी केली...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* ईस्ट इंडिया कम्पनी काय होती व तिने भारतात काय केले....
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर काय साध्य करण्याचा प्रयास झाला...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* अभ्यासू व विरश्रीने भरलेला *मंगल पांडे* कोण होता व त्याने कोणता कट आखला...
इत्यादी....
आपल्या भारताचा गौरवशाली इतिहास जेवढा आवश्यक आहे तेवढा आणि प्रत्येक लहानांपासून वयस्करांना समजेल अशा भाषेत कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सदगुरु बापू) यांनी आजच्या दै. प्रत्यक्ष मध्ये दिला आहे...
खरंच चुकवू नका..
आपल्या मुलांनाही आवर्जून सांगा आपला हा गौरवशाली इतिहास ...
अजून पुढे काय असेल... काय दडलंय ह्या इतिहासात... जाणून घेण्यासाठी आपला मित्र 'दै. प्रत्यक्ष'
अंबज्ञ 😊
इतिहासात दडलंय तरी काय?
- राणीचा जाहीरनामा म्हणजे काय?
- जालियनवाला बाग प्रकरण...
- दांडी यात्रेवेळी काय घडलं...
इ. अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी अग्रलेखाचा येणारा पुढचा भाग वाचायलाच हवा, नाही कां?
*राम, जानकी व शिव एकत्र आल्यावर अशुभाचा नाश होणारच!*
🙏
अग्रलेखातून स्वयंभगवानाची लीला जागोजागी पाहावयास मिळतेय.
🙏
आपलीच माणसे जेव्हा फितूर होतात व शत्रूशी हातमिळवणी करतात तेव्हा आपलं नुकसान तर होतच पण सोबत देशाचंही नुकसान होतं...
अशा फितूरांशी कसं लढायचं किंवा काय मार्ग निवडायला हवा हे समजून घेण्यासाठी आजचा अग्रलेख तर वाचायला हवाच, नाही कां? 😊
ज्या स्वातंत्र्याचा आपण उपभोग घेतोय ते स्वातंत्र्य मिळावे असे स्वप्नं उरी बाळगणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व क्रांतिकारकांनी आपला हेतू साध्य होईपर्यंत कशा प्रकारे आपले कार्य केले आणि समाजामध्ये कसे बनून राहिले याचा अभ्यास आजच्या अग्रलेखातून होतोय.
खूप मस्त अग्रलेख
हे फक्त आपला बापच सांगू शकतो आणि जाणीव करून देऊ शकतो.
दै. प्रत्यक्ष एकमेव आपला खरा मित्र
दै. प्रत्यक्ष मध्ये सुरु झालेल्या नवीन कथेच्या पहिल्याच भागात एक जबरदस्त आश्वासन...
देव, देश आणि धर्मासाठी आपण केलेल्या पवित्र कार्याचे
.... इतिहासात जरी नाव नोंदले गेले नाही, तरी
*स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या हृदयात नक्की स्थान मिळेल*
कारण
*"तो"* एकच खरा आहे.
🙏🙏🙏
तुलसीपत्र १३७४-१३७६
(इतर सद्विद्या बद्दल वाचण्यासाठी येथे क्लीक करा .)
शांभवी विद्या ही ह्या विश्वातील श्रीविद्येची
सर्वश्रेष्ठ देणगी आहे.
ही विद्या म्हणजे
ह्या विश्वातील कुठल्याही पदार्थांचे, ऊर्जास्त्रोताचे ,ऊर्जासमूहांचे,मानवी मनाचे,
श्रद्धावानांच्या बुद्धीचे खऱ्याखुऱ्या श्रद्धावानाच्या संपूर्ण जीवनाचे अगदी टोकाचे परिवर्तन घडवून आणणारी आदिमातेची सर्वात मोठी देणगी आहे.
शांभवी विद्या👉 ही कधीच खंडित होत नसते.ती भागाभागात शिकता येत नाही किंवा तुकड्यातुकड्याने थोडीथोडी ग्रहण
करता येत नाही.
ह्या विद्येच्या एकूण १८ कक्षा आहेत.ह्यातील १६ कक्षा शिवगणांना व ऋषिकुमारांना जाणवतात.
पण १७ वी व १८ वी कक्षा मात्र अनुक्रमे
त्रिविक्रमाच्याव महादुर्गेच्या कृपेनेच प्राप्त होते.
आणि ह्या दोन कक्षा प्राप्त करून घेणे हेच
मानवी जन्माचे सर्वोच्च ध्येय असते.
ह्या १८ कक्षा म्हणजे शांभवी विद्येच्या १८
पायऱ्या आहेत.
शांभवी विद्या व श्रीविद्या कधी एकरूप असतात, तर कधी वेगवेगळ्या; व त्याचे कारणही एकच,
श्रद्धावानांना त्या सोप्या व्हाव्यात म्हणून.
श्रीविद्येशिवाय शांभवी विद्या नाही व शांभवीविद्येशिवाय श्रीविद्याही नाही.
थोडक्यात शांभवी विद्या म्हणजे त्रिपुरासुराचा वध कसा होतो हे शिकवणारी विद्या.
आणि हा त्रिपुरासुर म्हणजे तारका सुरांचे तीन पुत्र म्हणजेच मानवाने केलेल्या कर्मस्वातंत्र्याच्या दुरुपयोगाचे तीन परिणाम.
विद्युन्माली म्हणजे भावापराध
कमलाक्ष म्हणजे प्रज्ञापराध
तारकाक्ष म्हणजे न्यायापराध.
ह्या तीन्हीं प्रकारच्या अपराधांचे एकत्रित
व्यक्तिमत्त्व म्हणजे त्रिपुरासुर.
जेव्हा मानवाला पूर्ण पश्चात्ताप होऊन तो आदिमातेस व त्रिविक्रमास मन:पूर्वक शरण
जातो,तेव्हाच त्रिशूळ धारण करणाऱ्या परमशिवाला आदिमाता त्या त्रिपुरासुराचा
वध करण्याची आज्ञा देते.
आणि ह्या त्रिपुरासुराचा वध कसा होतो ही विद्या म्हणजेच,
👇
🌷शांभवी विद्या🌷
आणि हे शिकवण्यासाठी अध्यापिका आहे
ब्रह्मवादिनी लोपामुद्रा .
कर्मस्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊच नये ह्या साठीचा एकमेव मार्ग म्हणजे कर्मस्वातंत्र्याचे स्तंभन करवून घेणे.
व कर्मस्वातंत्र्याचे स्तंभन करण्याचा अधिकार आदिमाता अनसूयेने माता शिवगंगागौरीकडे सोपविलेला आहे.
नितांत पश्चात्ताप होऊन शरण गेलेल्या
श्रद्धावानांसाठी, आदिमातेची क्षमा व त्रिविक्रमाचे अकारण कारुण्य दैवी पवित्र आधार तयार करीत राहते.ते दैवी पवित्र आधार वापरण्यास शिकण्याची कला अर्थात् मार्ग म्हणजेच,
🛎 शांभवी विद्या.🛎
ह्याची एकमेव गुरु केवळ ही आदिमाता
स्वतःच आहे.
आदिमातेची सर्जनशक्ती,नवनिर्मितीची शक्ती जेवढी बलवान,तेवढीच हिची तिने तयार केलेल्या कणापासून ब्रह्मांडापर्यंतच्या
इदं अनिरुद्धस्य!
श्रीराम! अंबज्ञ!नाथसंविध्!
वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करून नामानिराळा राहणाऱ्या "त्या"चे आभार तरी आपण कसे मानणार.
🙏
*आपला स्वयंभगवान आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय कधीच राहात नाही.*
... यासाठी तो कुणालाही आपला *एजंट* म्हणून वापरत नाही....
... त्याचे प्रत्यक्ष मदतीचे मार्ग जाणून घेण्यासाठी आजचा अग्रलेख वाचायलाच हवा.
अंबज्ञ
🙏